digital products downloads

उन्हाळ्याची आतापासूनच दहशत! मुंबई, कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना फटका, उत्तरेकडेून वाहताहेत हवामान बदलांचे वारे

उन्हाळ्याची आतापासूनच दहशत! मुंबई, कोकणासह ‘या’ जिल्ह्यांना फटका, उत्तरेकडेून वाहताहेत हवामान बदलांचे वारे

Maharashtra Weather News : फेब्रुवारी महिन्यापासूनच महाराष्ट्रात थंडीचा कडाका कमी होऊन एकाएकी तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात दक्षिण किनारपट्टीवर सक्रिय असणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं केरळापासून महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसानंही हजेरी लावली, तर कुठं सातत्यानं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. हे सर्व बदल होत असतानाच आता हळुहळू राज्यातील कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या हिमालय पर्वतरांगेवरून, सीमेपलिकडून येणारे थंड वारे आता कमी वेगानं वाहत असून, या वाऱ्यांचा प्रवाह आणि तीव्रता कमी झाल्यानं थंडी देशातून हळुहळू काढता पाय घेतना दिसत आहे. महाराष्ट्रावरही याचे परिणाम होत आहेत. राज्यात मुंबई शहर, उपनगर, ठाणे, रायगड, पालघर आणि कोकण किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमाल तापमानाचा आकडा 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असल्यानं उष्मा अधिक तीव्र होताना दिसत आहे. अद्याप फेब्रुवारीच सुरू असून ऐन एप्रिल – मे महिन्यात उन्हाळा आणखी किती तीव्र होणार? याच प्रश्नानं अनेकांना धडकी भरत आहे. इथं किमान तापमान 22 ते 24 अंशांदरम्यान असून हवेतील आर्द्रतेच्या अधिक प्रमाणामुळं उष्मा अधिक जाणवत असून आरोग्यावरही परिणाम करताना दिसत आहे. 

पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात काय स्थिती? 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमधील हवामान कोरडं असल्यानं इथंसुद्धा कमाल तापमानात वाढ झाली असून गारठा हळुहळू कमी होत आहे. दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवण्यास सुरुवातही झाली आहे. पुढील 24 तासांमध्ये ही स्थिती फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे, तर मराठवाडा आणि विदर्भातही कायम राहणार असून, नागपूर, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा, गडचिरोली इथं उष्णतेत वाढ होताना दिले. 

हवामान विभागानं राज्यासह देशातील हवामानात होणारे बदल, वाऱ्याची दिशा आणि किनारपट्टीभागात निर्माण होणारी चक्राकार वाऱ्यांची स्थिती पाहता सध्या महाराष्ट्रासाठी उष्णता आणि तापमानवाढीचा अलर्ट जारी केला आहे. तर, देशाच्या दक्षिण किनारपट्टीवर पावसाची तुरळक हजेरी वगळता उर्वरित भागांमध्ये आकाश बहुतांशी निरभ्र असेल असा अंदाज वर्चवला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरमध्ये पर्वतीय भागांवर पावसाचा शिडकावा होऊ शकतो. तर, मैदानी भागांमध्ये कमाल तापमानात अंशत: वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp