digital products downloads

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पक्षातील नेत्यांना, मंत्र्यांना फोन, म्हणाल्या ‘यापुढे…’

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पक्षातील नेत्यांना, मंत्र्यांना फोन, म्हणाल्या ‘यापुढे…’

Sunetra Pawar call to party leaders and ministers: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्रिपदानंतर आता सुनेत्रा पवार पक्षाची सूत्रंही हाती घेण्याच्या तयारीत आहेत. यादरम्यान त्यांनी पक्षातील नेते, मंत्र्यांशी संवाद सुरु केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवारांचा नेते, मंत्र्यांना फोन

सुनेत्रा पवारांनी नुकतंच त्यांनी पक्षाच्या सर्व नेते आणि मंत्र्यांना फोन केला असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा पक्षातील नेत्यांना, मंत्र्यांना फोन केला. यावेळी त्यांनी कठीण काळात पाठीशी राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. पुढे देखील अशी तुम्ही साथ राहु द्या असं मंत्री, आमदार आणि नेत्यांना त्यांनी आवाहन केलं आहे. 

शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीमधील सहयोग सोसायटीमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, शरद पवार, जय पवार, नीता पाटील, विजया पाटील, श्रीनिवास पवार, रोहित, राजेंद्र, रणजित पवार असे सर्वजण उपस्थित होते आणि सर्वांच्या भेटी घेतल्या. शरद पवारही तिथे पोहोचले होते. यावेळी तेदेखील खुर्चीत बसून पवार कुटुंबासह शोकसभेसाठी आलेल्या सर्वांची भेट घेताना दिसले. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले होते. दरम्यान यावेळी त्यांच्यात काय चर्चा झाली हे समोर आलेलं नाही.  

शरद पवारांनी नातवांना दिले कामकाजाचे धडे

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीदरम्यान आजोबा शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांनी संस्थेच्या कामकाजाचे धडे दिल्याचं समजत आहे. संस्थेचं कामकाज नेमकं कसं चालतं? अजित पवारांची भूमिका नेमकी कशी होती? विद्या प्रतिष्ठानमधील अजित पवारांचं काम तुम्हाला पुढे कसं नेता येईल? संस्थेच्या कामकाजासंबंधी पार्थ आणि जय यांना इतर विश्वस्तांकडून सविस्तर माहिती देण्यात आली. 

विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत पार्थ आणि जय पहिल्यांदाच सहभागी झाले होते. मात्र संस्थेत अजित पवारांची जागा कोण घेणार? याबाबत माञ अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp