digital products downloads

उपोषण सोडताच जरांगे पाटलांना अश्रू अनावर, मराठा आंदोलनाला मिळालेलं यश पाहून भावुक

उपोषण सोडताच जरांगे पाटलांना अश्रू अनावर, मराठा आंदोलनाला मिळालेलं यश पाहून भावुक

Maratha Reservation : मागील 5 दिवसांपासून आझाद मैदानावर सुरु असलेलं मराठा आंदोलन आज मंगळवारी अखेर संपलं. राज्य सरकारने जीआर काढून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं आहे. मुंबईमध्ये मागील 5 दिवसांपासून मराठा आंदोलकन आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते. तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्र त्यांनी ठेवला होता. मात्र अखेर जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि जीआर सुद्धा काढला. त्यानंतर सरकारच्या शिष्ठमंडळाच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण सोडलं. मात्र त्यानंतर जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले. मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला. 

Add Zee News as a Preferred Source

कोणत्या मागण्या मान्य झाल्या? 

1) हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय (GR)
2) सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय (स्वतंत्र GR)
3) मराठा व कुणबी एक असल्याचा निर्णय तांत्रिक बाबी तपासून जलदगतीने घेतला जाणार
4) आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा GR काढला 
5) आंदोलनात बलिदान दिलेल्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय
6)  मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना RTO कडून करण्यात आलेला दंड माफ

कोणत्या मागण्या मान्य झाल्या नाहीत?

1)  संविधानाला धरून आरक्षण देणे: मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत बसणारे आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण देणे.

2) सगेसोयरे धोरणाची पूर्ण अंमलबजावणी: मराठा समाजातील कुणबी नोंदींवर आधारित सगेसोयरे (नातेसंबंध) धोरणाची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे.

हेही वाचा : Hyderabad Gazette GR: हैदराबाद गॅझेटमध्ये नेमकं काय लिहिलं आहे? वाचा राज्य सरकारने काढलेला GR

 

FAQ : 

मराठा आंदोलन कुठे आणि किती दिवस सुरू होते?

मराठा आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर मागील 5 दिवसांपासून (28 ऑगस्ट 2025 ते 2 सप्टेंबर 2025) सुरू होते.

उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया काय होती?

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर झाले, आणि मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला.

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

हैदराबाद गॅझेट हा निझाम काळातील (1918 मधील) अधिकृत दस्तऐवज आहे, ज्यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहेत. 1901 च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये आहे, आणि त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा-कुणबी लोकसंख्या होती. हा दस्तऐवज उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये उपलब्ध आहे.

मराठा आरक्षणाशी सातारा आणि हैदराबाद गॅझेटचा काय संबंध आहे?

सातारा गॅझेट: सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात, ज्याचा उपयोग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी पुरावा म्हणून केला जातो. हैदराबाद गॅझेट: 1918 मध्ये निझाम सरकारने मराठा समाजाला “हिंदू मराठा” म्हणून नोंदवून शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण दिले होते. यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा केला जातो, आणि हा दस्तऐवज मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरला जातो.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp