
चंद्रपूर मनपामध्ये कुणी शेण खाल्ले या भानगडीत संजय राऊत यांनी पडू नये. कारण 2019 मध्ये पहिल्यांदा शेण खाण्याचे काम संजय राऊत आणि उबाठाने केले होते. सत्ता आणि खुर्ची यासाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणे याला शेण खाणे म्हणतात. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसचा कायम विरोध केला होता.आज तुम्ही काँग्रेससोबत गेले याला शेण खाणे म्हणतात. चंद्रपूरमध्ये विकास आणि हिंदुत्ववादासाठी युती झाली आहे, तुमच्यासारखे अर्धामाची युती झालेली नाही, टोपलं भर शेण खाणाऱ्यांनी दुसऱ्यावर टीका करू नये, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, परभणीमध्ये एकनिष्ठ शिवसैनिकाला महापौर केले असा दावा जनाब संजय राऊत करतात. तुम्हाला एकही निष्ठावान मराठी माणूस भेटला नाही का? तुमच्या नगरसेवकांपैकी एकही माणूस तसा नव्हता का? आमचा मुस्लीमांना विरोध नाही पण औरंगजेब फॅन क्लबचे काम जसे तुम्ही करत आहात त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही औरंगजेबाची पिलावळ वाढवण्याचे काम करत आहात त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही औरंगजेब आणि अफजल खानाचा अजेंडा पुढे रेटत आहात. परभणीत बाळासाहेब म्हणायचे खान नाही तर बाण निवडा पण उबाठाने बाण बाजूला करत खान निवडला हे महाराष्ट्र बघतो आहे. राऊतांनी किती कमीशन घेतले नवनाथ बन म्हणाले की, एकनाथ शिंदे भाजपसोबत आले त्यावेळी तुम्ही 50 खोके एकदम ओके या घोषणा देत होतात त्यावेळी तुम्हाला लाज वाटत होती का? जेव्हा 50 खोकेंचे आरोप केले त्यावेळी संजय राऊत तिथे पैसे मोजून देण्यासाठी बसले होते का? असा टोला बन यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी पैसे मोजून देतांना त्यातून 20 ते 25 टक्के कमीशन घेतले होते का? आज तुमच्यावर आरोप झाला तर तुमचा जळफळाट होतो मग एकनाथ शिंदेंवर बिनबुडाचे आरोप केले त्याचे पुरावे द्या, त्यावेळी तुम्ही कमीशन घेतले याचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे. .. तर तुम्हाला अवघड होईल नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत पाटकर फाईल आली तर तुम्हाला तोंड दाखवायला जागा मिळणार नाही. अलिबागमध्ये केलेले काळे कारनामे जर समोर येतील. काश्मीर फाईल, केरळ फाईलमध्ये या देशातील अन्यायाचे कथानक आहे, तर पाटकर फाईलमध्ये महिलांवर अन्यायाचे कथानक आहे. पाटकर फाईल आणि राऊतांचा काय संबंध हे जनतेला माहिती आहे. तुम्ही एका महिलेला कसा त्रास दिला जनतेला माहिती आहे. देशाने आणि महाराष्ट्रातील जनतेने तुम्हाला चले जाव म्हणत तुम्हाला हद्दपार केले आहे, जनतेने तुम्हाला नाकारत घरात बसवले आहे त्यामुळे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करु नये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



