
इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्यात युद्धाचा भडका उडाल्याने त्याचा फटका आखाती देशांनाही बसला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील नागरिक हे दुबईत अडकून पडले आहेत. या नागरिकांना शक्य ती मदत करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. या युद्धामुळे ठाणे, मुरबाड, पुणे, अहिल्यानगर अशा विविध भागातून दुबईला गेलेल्या नागरिकांनी मदतीसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क केला. यात पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टेडीजच्या विद्यार्थ्यांचाही समावेश होता. या महाविद्यालयाचे 84 विद्यार्थी सध्या दुबईत अडकून पडले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दुबईतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे डॉ. संजीव पैठणकर आणि सोमनाथ पाटील यांच्या मदतीने या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी त्यांना धीर दिला. या कठीण परिस्थितीत हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे महाराष्ट्रात परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न नक्की केले जातील असे शिंदे यांनी सांगितले. तसेच तिथे अडकलेल्या इतर नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. आपण कोणतीही चिंता करून नका, जिथे आहात तिथे आपल्याला काही कमी पडू नये यासाठी शक्य ती सारी मदत देण्याचे प्रयत्न बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने करण्यात येत असल्याचे शिंदे यांनी त्यांना सांगितले. तसेच महाराष्ट्र शासन आणि उपमुख्यमंत्री म्हणून हा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी ठामपणे उभा असून तुम्हाला सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न केले जातील असे सांगून शिंदे यांनी या नागरिकांना आश्वस्त केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



