
एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी या कोल्हापूरातील आभार यात्रेत बोलताना केले. जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले, असेही धैर्यशील माने म्हणाले.
.
कोल्हापूरातील सरवडे येथे शिवसेनेच्या वतीने आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार केला. या कार्यक्रमात बोलताना धैर्यशील माने यांनी उपरोक्त वक्तव्य केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी केली. ,
नेमके काय म्हणाले धैर्यशील माने?
जनतेचा मुख्यमंत्री कसा असावा हे एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिले आहे. एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे माने म्हणाले. नगरसेवक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचे काम एकनाथ शिंदे साहेबांनी केले. तुमच्यासारखा नेता मिळणे हे आम्हा सर्वांचे भाग्य आहे, असेही माने म्हणाले. साहेब आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत. आम्ही तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याला मंत्री मागत होतो. पण तुम्ही आंधळा मागतो एक डोळा तुम्ही दोन डोळे दिले. मंत्रीपद तर दिलेच पण तुम्ही पालक मंत्रीपद देखील दिले, असे माने यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे यांचीही जोरदार टोलेबाजी
या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जोरदार टोलेबाजी करत महाविकास आघाडीवर निशााणा साधला. या विधानसभा निवडणुकीत जनतेने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. लोकसभेमध्ये फेक नॅरेटीव्ह पसरवले. संविधान धोक्यात आहे, आरक्षण जाणार अशा खोट्या गोष्टी पसरवल्यामुळे आमचे संजय मंडलिक त्यात अडकले. त्यांना वाटले विधानसभा निवडणुकीतही असेच करू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचे वाटप केले आणि म्हणाले, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना जेलमध्ये टाकू. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवून मारू. एवढी हवा त्यांच्या डोक्यात गेली होती, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीवेळी ज्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घातला होता, त्यांना तुम्ही चांगला कोल्हापुरी जोडा दाखवला. महायुतीचे सरकार आले. आजही आमची टीम तिच आहे. देवेंद्रजी, मी आणि अजित दादा, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
कोल्हापुरात काही नेते दिसायला भोळा आणि भानगडी सोळा
मी कुणाला छेडत नाही, पण मला छेडले तर सोडत नाही. आम्ही काही लपून छपून करत नाही, खुलेआम करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला. काही नेते दिसायला साधे असतात. दिसायला भोळा आणि भानगडी सोळा, असे काही नेते कोल्हापुरात आहेत असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. आता हा टोला एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील कोणत्या नेत्याला लगावला याची जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे.
यूज अॅण्ड थ्रो करणाऱ्यांना थ्रो केले
कोल्हापूर आणि शिवसेनेचे नाते वेगळे आहे. बाळासाहेब नेहमी कोल्हापुरातून प्रचाराचा शुभारंभ करायचे. पण बाळासाहेब यांच्या विचारांचा गळा घोटाणाऱ्याबद्दल काय बोलावे? कोल्हापूरकरांनी ‘एक ही मारा लेकीन सॉलिड मारा’. बाळासाहेब यांचे विचार बदलले त्यांना धडा शिकवण्याचे काम कोल्हापूरकरांनी केले. कोल्हापूरकरांनी यूज अॅण्ड थ्रो करणाऱ्यांना थ्रो करून टाकले, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
कोल्हापूरकरांनी विरोधांना जागेवर पलटी केले
लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडक्या शेतकऱ्यांनो तुमचे आभार मानतो. व्यासपीठ आमचे मजबूत आहे आणि समोर बसलेले आमचे वैभव आहे. निवडणुकीत मी वचन दिले होते. म्हणून आभार मानायला आलो. अडीच वर्षात तुमचा एकनाथ शिंदे 22 तास काम करत पायाला भिंगरी बांधून फिरला. काम केले निर्विवाद म्हणून जनतेने दिले भरभरून आशीर्वाद. आमचे ठरले म्हणत कोल्हापूरच्या जनतेनं 10 पैकी 10 आमदार दिले. इथे खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी केले, टांगा पलटी घोडे फरार. तुम्ही प्रकाशला आमदार केले, मी त्यांना नामदार केले, पालकमंत्री केले, अशी फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.