
Mandale Metro Depot Metro Line 2B : रेल्वे प्रमाणेच भारतातील अनेक राज्यांमध्ये मेट्रो ट्रेनचे जाळे तयार केले जात आहे. विशेषत: महाराष्ट्रात अनेक मोठे रल्वे प्रकल्प उभारले जात आहे. यात मुंबईत निर्माण होत असलेले मेट्रो रेल्वे प्रकल्प विशेष लक्षवेधी ठरत आहे. पूर्व उपनगर आणि हार्बर रेल्वे लाईन जोडणाऱ्या मार्गावर मेट्रो-2 बी ची यशस्वी ट्रायल झाली. भारतातील सर्वात मोठा मेट्रो डेपो महाराष्ट्रात अर्थात मुंबईत बनला आहे. इथं एकाचवेळेस 72 मेट्रो उभ्या राहतील.
मुंबईकरांचा प्रवास अधिक जदल आणि सुसाट होणार आहे. पूर्व उपनगर आणि हार्बर रेल्वे लाईनवरील प्रवाशांसाठी नविन मेट्रो मार्ग सुरु करण्यात आला आहे. लवकरच मुंबईत मेट्रो-2 बी धावणार आहे. डीएन नगर ते मंडाले या पहिल्या टप्प्यातील मेट्रो २ बी प्रकल्पात पहिले 5 स्टेशन कार्यरत केले जात आहेत.
मंडाले, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक डायमंड गार्डन या स्थानकांदरम्यान 5.39 किमी च्या टप्प्यावर मेट्रोची ट्रायल रन सुरु करण्यात आली आहे. मेट्रो २ बी चं वैशिष्ट्य म्हणजे भारतातला सर्वात मोठा मेट्रो डेपो मंडाले येथे तयार करण्यात आलाय. 31 हेक्टर जागेवरच्या या डेपोत एकाच एकाचवेळी 72 मेट्रो उभ्या केल्या जाऊ शकतात.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही मेट्रो मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी एमएमआरडीएकडून अंधेरी पश्चिम ते मानखुर्द-मंडाळेदरम्यान तब्बल 23 किलोमीटरची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. पहिल्या टप्प्यात मंडाळे डेपो ते डायमंड गार्डन चेंबूरदरम्यानच्या मेट्रो मार्गिकचे काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान, मुंबई मेट्रो लाईन- ५ च्या कामाचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे–भिवंडी–कल्याण या मुंबई मेट्रो लाईन ५ च्या (पहिला टप्पा) अंतर्गत मध्य रेल्वेच्या वसई-दिवा मार्गावर अंजुरफाटा, भिवंडी येथे 65 मीटर लांबीचा “ओपन वेब गर्डर (OWG)” यशस्वीरित्या बसवण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली आहे. एमएमआरडीएने कठीण काम तीन टप्प्यात केले आहे. यात वर्दळीचा महामार्ग तसेच चालू रेल्वे मार्ग अशा आव्हानात्मक स्थितीवर मात करुन अचूकता, समन्वय आणि व्यापक नियोजन यांच्या आधारे २० मीटर उंचीच्या व्हायाडक्टला बसवण्याचे कठीण काम वेळेत पूर्ण केले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.