digital products downloads

एका घाटगेंना रोखण्यासाठी दुसऱ्या घाटगेंचा भाजपप्रवेश, कागलमध्ये समीकरण बदलणार?

एका घाटगेंना रोखण्यासाठी दुसऱ्या घाटगेंचा भाजपप्रवेश, कागलमध्ये समीकरण बदलणार?

Kolhapur Politics: कोल्हापूरच्या कागलमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. संजय बाबा घाटगेंच्या भाजप प्रवेशामुळे कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलणार आहेत. संजय बाबांचा भाजप प्रवेश हा शरद पवार गटाचे नेते समरजीत घाटगे यांच्यासाठी अडचणी ठरणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील राजकारण  नेहमीच चर्चेत राहिलंय. या मतदारसंघात नेहमीच पक्षापेक्षा संजय मंडलिक,  हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे याच्या गटाच्या भूमिका महत्त्वाच्या ठरलेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळालं. ठाकरे गटाचे नेते  नेते संजय घाटगे यांनी पक्ष नेतृत्वाशी  कोणतीही चर्चा न करता थेट  निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठिंबा जाहीर केला. या पाठिंबामुळे  हसन मुश्रीफ यांचा विजय सुकर झाला. आता याच संजय बाबा घाटगे यांनी आपल्या चिरंजीवासह भाजपात प्रवेश केलाय. या पक्षप्रवेशामुळे  कागलच्या राजकारणातील समीकरणे पून्हा एकदा बदलून गेलेत. 

संजय घाटगे यांचा कागल विधानसभा मतदारसंघातील राजकीय प्रवास

संजय घाटगे 1990  साली जनता दलाची उमेदवार होते, दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून  ते पराभूत झाले होते. 1998  साली झालेल्या पोटनिवडणुकीत  शिवसेनेच्या तिकिटावर  संजय घाटगे यांचा विजय झाला होता. 1999 साली काँग्रेस पक्षाचे उमेदवार पण त्यांचा पराभव झाला. 2004 साली पुन्हा शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरले आणि पुन्हा त्यांचा पराभव झाला. 2009 मध्ये  राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाकडून निवडणूक रिंगणात तेथेही त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये शिवसेनेकडून ते पुन्हा निवडणूक रिंगणात उभे राहिले पण पुन्हा पराभव झाला. 2019 मध्ये ठाकरे शिवसेनेत असताना वरिष्ठांची कोणतीही चर्चा न करता त्यांनी थेट हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला. त्यानंतर आता संजय घाटगे हे आपल्या चिरंजीवासह भाजप पक्ष प्रवेश करणार आहेत. माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने कागलमध्ये भाजपची ताकद पुन्हा एकदा वाढलीय.. इतकंच न्हवे तर शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांमध्ये संजयबाबा घाटगे हे अग्रभागी होते… त्यामुळे या महामार्गाचा मार्गही मोकळा होण्याची शक्यता आहे.  सोबतच आगामी गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपला संजय घाटगे याची साथ  मिळणं बेरजेचं ठरणाराय.

प्रत्येक विधानसभा निवडणुकीत  संजय बाबा घाटगे यांच्या भूमिकेमुळे  हसन मुश्रीफ यांना फायदा होतो असं बोललं जातं. आता देखील  संजय घाटगे याच्या भाजप पक्षप्रवेशामुळे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक समरजित घाटगे यांना दणका तर मुश्रीफ यांना फायदाच होणार अशी चर्चा सुरु आहे.

संजय घाटगे यांच्या  भाजप पक्ष प्रवेशामुळे  समरजीत घाटगे  याची मोठी अडचण निर्माण झालीय.विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समरजीत घाटगे भाजप  वाटेवर असल्याची चर्चा देखील  जोरदार सुरू होती. मात्र संजय बाबांच्या प्रवेशाने आता समरजीत घाटगेंची मोठी राजकीय कोंडी झालीय.कागलच्या राजकारणात संजय बाबा घाटगे यांची ताकद मोठी आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp