
शिंपी समाजातील सदस्यांनागणेशोत्सव उत्साहात साजरा करतायावा यासाठी चार वर्षांपासून एकरूपयात गणेश मूर्ती वितरण केलेजात आहे. यात चार वर्षांत ५५०गणेश मूर्तीचे वितरण केले असूनयावर्षी २०० मूर्ती दिल्या जाणारआहेत.
.
गणेशोत्सवात बाजारातआकर्षक मूर्ती उपलब्ध असल्यातरी किंमतीत वाढ होत आहे.अशावेळी आर्थिक परिस्थितीनसलेल्या समाजबांधवांनाही हाउत्सव आनंदात साजरा करता यावाम्हणून नामविश्व शिंपी समाजफाउंडेशन व एकता शिंपी समाजसंस्था हा उपक्रम राबवत आहे.
निधीचे नियोजन
बाजारात १४ ते १५ इंचउंचीची मूर्ती ४०० ते ५००रूपयांना मिळते. परंतूसमाजकार्य आणि एकाचवेळी २०० मूर्ती घेणारअसल्याने मुर्तीकाराकडून१५० ते २०० रुपयांपर्यंतखरेदी केली जाते. अशा२०० मूर्तीची गेल्या सहामहिन्यांपूर्वी ऑर्डर दिलीजाते. पैसे दोन्ही संस्था वदाते देतात. पहिल्या वर्षी१०० मूर्ती तर तीन वर्षातमागणी पाहता १५० मूर्तीचेवितरण केले. यंदा २०० मूर्तीवाटप करण्यात येतील.
२०पासून नोंदणी :
कांचन नगरातीलनाना कापडणे, शिव कॉलनीत नामविश्वशिंपी समाज फाउंडेशन अध्यक्ष संदीपजगताप, योगेश सोनवणे यांच्याकडे २०ऑगस्टपासून नाेंदणी हाेईल. २६ राेजी शिवकॉलनीत मूर्ती वितरण हाेईल. एकता शिंपीसमाज संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत जगताप,संदीप जगताप हे सहकार्य करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.