
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (एडीसीसी) अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांच्या संचालक आणि अध्यक्षपदाच्या अपात्रेबाबतच्या याचिकेची सुनावणी आता मंगळवार, २४ जून रोजी होणार आहे. या प्रकरणातील प्रतिपक्षाने आपली बाजू मांडण्यासाठी दोन दिवसांचा वेळ म
.
एडीसीसीचे संचालक हरिभाऊ मोहोड व इतर ११ संचालकांनी बच्चू कडू हे संचालक व अध्यक्षपदासाठी पात्र ठरत नसल्याची तक्रार विभागीय सहनिबंधक यांच्याकडे केली होती. कडू यांना नाशिकच्या न्यायालयाने एका प्रकरणात दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा ठोठावली आहे. सन २०१७ सालचे हे प्रकरण आहे. त्यामुळे बँकेच्या उपविधीनुसार ते संचालक आणि पर्यायाने अध्यक्षपदासाठी अपात्र ठरतात, असा तक्रारकर्त्यांचा युक्तीवाद होता. ही बाब ग्राह्य धरुन विभागीय सहनिबंधक यांच्या न्यायालयाने बच्चू कडू यांना दोन्ही पदांसाठी अपात्र ठरविले. अपात्रतेबाबतचा हा निर्णय गेल्या सोमवारी सार्वजनिकरीत्या समोर आला.
त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी बच्चू कडू यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. विभागीय सहनिबंधकांच्या निर्णयाला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती पानसरे यांच्या एकलपीठासमोर आज, गुरुवारी या याचिकेची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान प्रतिपक्षाने दोन दिवसांचा अवधी मागितला. मुळात या प्रकरणात प्रतिपक्षानेही मंगळवारीच ‘कॅव्हेट’ दाखल केलेला असल्याने न्यायमूर्तींनी अवधी मागण्याचा त्यांचा मुद्दा ग्राह्य धरत पुढील सुनावणी २४ जून रोजी निश्चित केली. बच्चू कडू यांच्या वतीने या प्रकरणात ॲड. पराग कडू युक्तीवाद करणार आहेत. तर प्रतिपक्षाची बाजू मांडण्याचे काम ॲड. निलेश गावंडे करीत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.