
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपची केंद्रीय निवडणूक समितीची पार्लमेंटरी बोर्डची बैठक होईल. त्यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा निर्णय निश्चितपणे होईल. कुणीही एकमेकांना धोका देण्याचा प्रयत्न करणार नाही, भाजप तसे कधीही करत नाही, नितीशकुमार आमच्यासोबतच आहेत, अस
.
बिहारमध्ये एनडीएचे सरकार बनणार आहे आणि नितीशकुमार आणि भाजपच्या नेतृत्वातील सरकार येईल. आज राहुल गांधी आणि आणि तेजस्वी यादव यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. ज्या पद्धतीने बिहारमध्ये यादव यांचे जंगल राज होते जनता त्यांच्याविरोधात बाहेर पडली होती.मोठ्या प्रमाणात महिला मतदानासाठी बाहेर पडल्या आणि त्यांचे मतदान हे एनडीएलाच असणार असा विश्वास भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या 10 वर्षात बिहारचा विकास
नवनाथ बन म्हणाले की, बिहारमधील सर्व माता-भगिनींचे आशीर्वाद नितीशकुमार-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळतील. गेल्या 10 वर्षात बिहारचा विकास एनडीएकडून करण्यात आला आहे. जंगल राजमुळे बिहारच्या लोकांना त्यांचे राज्य सोडून दुसरीकडे जावे लागते याला जबाबदार तेजस्वी यादव आहेत, असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
एनडीएमध्ये दुरावा नव्हता
नवनाथ बन म्हणाले की, बिहारमध्ये यावेळी जातीच्या नाही तर विकासाच्या मुद्यावर निवडणूक झाली.जंगल राजविरुद्ध मतदान करत मंगल राज आणण्यासाठी जनतेने मतदान केले आहे.अनेक भागात लालूप्रसाद यादव, राहुल गांधी यांच्या टीमकडून जातीय वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला.परंतू बिहारच्या जनतेने त्यांना नकार दिला आहे. भाजपची रणनिती ही अतिशय चांगली होती, पण इंडिया आघाडीमध्ये मात्र वाद दिसून येत होते.
जनता एनडीएला कौल देईल
नवनाथ बन म्हणाले की, बिहारमधील निवडणूक ही जंगल राज विरुद्ध मंगल राज, घराणेशाही विरुद्ध लोकशाही अशा पद्धतीची लढाई होती. आता जंगलराज गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये संपलेले आहे, त्यामुळे बिहारची जनता मंगल राजच्या बाजूने कौल देईल. ज्या पद्धतीने घराणेशाही करण्यात आली होती तिला डावलून लोकशाही मार्गाने आमच्या सरकारला कौल मिळेल.
राहुल गांधींकडे प्रचाराला मुद्दाच नव्हता
नवनाथ बन म्हणाले की, नितीशकुमार यांच्या नेतृत्वात बिहारचा विकास होत आहे. डबल इंजिनचे सरकार विकास कामे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांच्या सारख्या नेतृत्वाला जनता सत्तेत आणेल. राहुल गांधी यांनी मतचोरीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला होता. पण तिथे एसआयआर झाल्याने त्यांच्या मुद्द्यातील हवाच निघाली आहे. अनेक बोगस नावे निवडणूक आयोगाने वगळली आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



