
ST Mahamandal Pass Yojana: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला अधिक प्रतिसाद मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता राज्यातील ई-बस प्रवाशांना मासिक व त्रैमासिक पास सवलत योजना उपलब्ध होणार आहे.
एसटी महामंडळाने घेतलेल्या पास योजनांचा मुख्य उद्देश नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सध्या महामंडळाच्या ताफ्यात ई-बस प्रकल्पातील 448 बसेस आणि शिवाई प्रकल्पातील 50 ई-बसेस कार्यरत आहेत. या बसेसची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस असल्याचे सरनाईक म्हणाले.
मुंबईपासून जवळ असलेल्या ठाणे -अलिबागसारख्या मार्गावर मोठ्या संख्येने दैनंदिन प्रवासी तसेच ई-बसेस सेवा आहेत. योजनेमुळे प्रवाशांचा फायदा होईल.
काय आहे ही योजना?
या योजनेंतर्गंत प्रवाशांना 60 दिवसांचे भाडे भरून 90 दिवस प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे.
कोणत्या बससाठी पास उपलब्धः 9 मीटर ई-बस, 12 मीटर ई बस आणि ई शिवाई सेवा (ई-शिवनेरीवगळून)
मासिक पास (30 दिवस): 20 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन 30 दिवस वैध
त्रैमासिक पास (90 दिवस): 60 दिवसांच्या परतीच्या प्रवासाचे भाडे आकारुन 90 दिवस वैध
काय फायदा होणार?
उच्च सेवा वर्गाचा पास असलेले प्रवासी निमआराम किंवा साध्या बसमधून प्रवास करु शकती. मात्र निमआराम किंवा साध्या बसचा पासधारक ई-बसने प्रवास करत असल्यास दोन्ही सेवांतील भाड्याचा फरक 100 टक्के दराने भरावा लागणार आहे.
FAQ
प्रश्न १: एसटी महामंडळाने ई-बससाठी नवी पास योजना काय सुरू केली आहे?
उत्तर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी आणि ई-बस सेवेला प्रतिसाद मिळवण्यासाठी मासिक आणि त्रैमासिक पास सवलत योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत नियमित प्रवाशांना सवलतीनुसार पास उपलब्ध होणार आहेत.
प्रश्न २: या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: नोकरी किंवा व्यवसायासाठी दररोज एकाच मार्गावर प्रवास करणाऱ्या नियमित प्रवाशांना ई-बस सेवेकडे आकर्षित करणे हा मुख्य उद्देश आहे. यामुळे ई-बस सेवेचा वापर वाढेल आणि प्रवाशांना फायदा होईल.
प्रश्न ३: या योजनेबाबत कोणाने माहिती दिली?
उत्तर: एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ई-बस ताफ्यातील बसांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवण्याचा मानस आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.