
ST Mahamandal Bus: राज्य मार्ग परिवहन एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी एक दिलसादायक घोषणा केली आहे. दिवाळीत लाखो प्रवासी प्रवास करतात. भाऊबीजेला एसटीला अधिक गर्दी असते. दिवाळीच्या आधीच एसटी महामंडळाने दिलासा दिला आहे. आवडेल तिथे प्रवास योजनेच्या पासमध्ये कपात करुन प्रवाशांना खुशखबर दिली आहे. ही कपात 7 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू केली आहे. यामध्ये 20-25 टक्के कपात केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
काय आहे आवडेल तिथे प्रवास योजना?
‘आवडेल तेथे प्रवास’ या योजनेअंतर्गत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कुठेही अमर्याद प्रवास करण्याची सुविधा मिळते. या योजनेत प्रवाशांना एकाच पासवर राज्यातील कोणत्याही एसटी बसने (लालपरी, सेमीलक्झरी, शिवशाही आदी) अमर्याद प्रवास करण्याची मुभा मिळते. एसटीचा चार किंवा सात दिवसांचा पास घेतल्यावर प्रवाशांना दरवेळी तिकीट काढण्याची आवश्यकता नसते.एसटी प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाससाठी अट काय?
एसटीच्या योजनेअंतर्गंत पौढ पासधारकास 30 किलो व 12 वर्षाखालील मुलास 15 किलो व 12 वर्षाखालील मुलास 15 किलो प्रवासी सामान मोफत नेता येते. प्रवाशांचा पास हरवल्यास त्याऐवजी दुसरा पास मात्र घेता येत नाही. प्रवाशांना तो पास जपून ठेवणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसंच, हा पास दुसऱ्या प्रवाशाला देईन त्याचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास तो जप्तदेखील केला जातो.
चार दिवसांच्या पासचे दर काय?
बस प्रकार- जुने दर (पौढ/मुले) सुधारित दर
साधी, जलद, रात्रसेवा 1814/910 1364/685
शिवशाही (आंतरराज्य) 2533/1269 1818/911
12 मीटर ईबस (ई शिवाय) 2861/1433 2072/1038
सात दिवसांचे पासचे दर काय?
बस प्रकार
साधी, जलद रात्रसेवा 3171/1588 2682/1194
शिवशाही (आंतरराज्य) 4429/2217 3175/1590
12 मीटर ईबस (ई-शिवाई) 5003/2504 3619/1812
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.