
ऐकावं ते नवलंच, चक्क पीएसआय निघाला चोर
बसस्थानकात टोळीच्या माध्यमातून करायचा चो-या
पाळत ठेऊन चोर पीएसआयच्या मुसक्या आवळल्या
निवृत्तीला काही महिने बाकी असलेल्या जालन्यातील पोलिस उपनिरीक्षकाला चोरीच्या गुन्ह्यात जळगावात अटक करण्यात आलीये. हा पीएसआय टोळीसह बसस्थानकांत जाऊन सोनसाखळ्यांची चोरी करायचा. चोपडा बसस्थानकात चोरी करून परत जाताना जळगाव पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडलंय. तपास केल्यानंतर सोनसाखळी चोरांच्या टोळीचा म्होरक्या पीएसआय असल्याचे समोर आले. जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद मान्टे याच्यासह चार जणांना पोलिसांनी पकडलंय. आरोपींडून एक कारसह रोख रक्कम जप्त केली. याप्रकरणी पीएसआय मान्टेसह, श्रीकांत बघे, अंबादास साळगावकर, रउफ शेख यांना पकडलंय. यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.
अटकेतील पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद पिरोजी मान्टे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना पोलिसाचा हा कारनामा समोर आल्याने खळबळ उडालीये.
जालन्यातील पोलिस उपनिरिक्षक प्रल्हाद पिरोजी मान्टे याला जळगावातून अटक केल्यानंतर पोलिसदलात खळबळ उडाली. त्यातही बसस्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहितीही पुढे आलीये. चोरांना पकडणारे पोलिसच चोर निघाल्याने सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगलीये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.