
MSEDCL Hikes Tariffs: दिवाळीचा सण हा प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र ऐन दिवाळीतच सर्वसामान्य नागरिकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे. ऑक्टोबरच्या बिलात प्रति युनिट 35 ते 95 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वीजदरवाढीमुळं घरगुती, व्यावसायिक आणि उद्योग या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे.
1 ऑक्टोबर रोजी महावितरण विभागाने एक परिपत्रक जारी केले होते. यात सप्टेंबरमध्ये झालेल्या वीज वापराबाबत इंधन समायोजन शुल्क आकारण्याचे आदेश दिले आहेत. 1 जुलैपासून महावितरणने वीज दर कमी केल्याचा दावा करत नवीन दर लागू केले होते. मात्र, लगेचच ऑगस्टपासून इंधन समायोजन शुल्क लादण्यास सुरुवात झाली आणि आता सप्टेंबरसाठीही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या ग्राहकांना बसणार आहे.
1 ते 100 युनिट वापरावर प्रति युनिट 35 पैसे आणि 500 युनिटपेक्षा अधिक वापरावर 95 पैसे प्रति युनिट जास्त द्यावे लागणार आहे. वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग दराने वीज खरेदी करावी लागली. तसेच, अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला, अशी माहिती महावितरणने दिली आहे.
बीपीएल
1 ते 100 युनिट
101 ते 300 युनिट
301 ते 500 युनिट
501 पेक्षा जास्त
प्रति युनिट – इंधन समायोजन शुल्क
15 पैसे
35 पैसे
65 पैसे
85 पैसे
95 पैसे
48 तासांतच विजेचा भार वाढणार
घरगुती ग्राहक, औद्योगिक, व्यावसायिक आणि लघुदाब ग्राहकांना वाढीव वीज हवी असल्यास आता जास्त वेळ खर्च करावा लागणार नाही. लघुदाब वर्गवारीतील वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जाना स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यामुळे ग्राहकसेवेचा नवा अध्याय सुरू झाला आहे. पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही, अशा ठिकाणी ग्राहकांनी शुल्क भरल्यानंतर 24 ते 48 तासांत मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर आणि कार्यान्वित केला जाईल.
FAQ
1: दिवाळीच्या निमित्ताने वीज दरवाढ का होत आहे?
उत्तर: दिवाळी हा प्रकाशाचा सण असला तरी, सप्टेंबर महिन्यातील वीज वापरानुसार ऑक्टोबरच्या वीज बिलात इंधन समायोजन शुल्क (FCA) आकारले जाईल. वीज मागणी वाढल्यामुळे ओपन मार्केटमधून महाग वीज खरेदी करावी लागली आणि अधिक उत्पादन खर्च असलेल्या युनिट्सचा वापर करावा लागला. यामुळे प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत वाढ झाली आहे. हे शुल्क १ ऑक्टोबर २०२५ रोजी महावितरणने जारी केलेल्या परिपत्रकानुसार लागू होईल.
2: कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना या दरवाढीचा फटका बसणार आहे?
उत्तर: घरगुती (रेसिडेन्शिअल), व्यावसायिक (कमर्शिअल), औद्योगिक (इंडस्ट्रिअल) आणि लघुदाब (LT) ग्राहकांना याचा परिणाम होईल. सर्वसामान्य नागरिकांसह बीपीएल (गरीबी रेषेखालील) ग्राहकांनाही हे शुल्क लागू होईल, ज्यामुळे बिल वाढेल.
3: वीजभार वाढीसाठी (लोड वाढ) अर्ज कसा करावा आणि मंजुरी किती वेळेत मिळेल?
उत्तर: घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक आणि लघुदाब ग्राहक आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. महावितरणने स्वयंचलित मंजुरी प्रक्रिया सुरू केली आहे. शुल्क भरल्यानंतर २४ ते ४८ तासांत मागणीप्रमाणे वाढीव वीजभार मंजूर आणि कार्यान्वित होईल. यासाठी पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही; फक्त ऑनलाइन पोर्टलवर अर्ज सादर करा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.