
Rain In October 2025 : यावर्षी वेळेपूर्वीच आलेल्या पावसाने अजून परतीचा प्रवास सुरु केलेला नाही. ऑक्टोबर महिन्याला सुरुवात झाली असून हवामान विभागाने यंदा किती टक्के पाऊस झाला हे जारी केलं आहे. तसंच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा अंदाज कसा असेल त्यांनी वर्तवला आहे. हवामान विभागाने सांगितलं की, सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. तर मराठवाड्यात सर्वाधिक 39 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात 20 टक्के अधिक पाऊस झाला आहे.
1 जून ते 30 सप्टेंबरमध्ये या चार महिन्यात सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यात राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाल्याच पाहिला मिळाला. मराठवाडा आणि सोलापुरात पावसाने थैमान घातला आहे. या पावसामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सर्वाधिक पाऊस मराठवाड्यात झाला आहे.
तर ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
राज्यात यंदा 120 टक्के अधिक पावसाची नोंद झाली असून जून ते सप्टेंबरमध्ये राज्यात 1189.4 मिमी पावसाची नोंद झाल्याचा हवामान विभागाने सांगितलंय. गेल्यावर्षी राज्यात 1252.1 मिमी पावसाची नोंद झाली असून 26 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. सलग दुसऱ्यांदा राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
FAQ
1: यावर्षी महाराष्ट्रात पावसाची सुरुवात आणि परतीची स्थिती काय आहे?
उत्तर: यावर्षी पावसाने वेळेपूर्वीच प्रवेश केला असून, अजून परतीचा प्रवास सुरू झालेला नाही. ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानेही पावसाचा मुक्काम कायम आहे.
2: हवामान विभागाने यंदाच्या पावसाचे प्रमाण किती जाहीर केले आहे?
उत्तर: जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात ११८९.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरीपेक्षा १२० टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी १२५२.१ मिमी पाऊस झाला होता, जो २६ टक्के अधिक होता. सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
3: कोणत्या महिन्यात आणि कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस झाला?
उत्तर: सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस कोसळला. मराठवाड्यात ३९ टक्के अधिक पाऊस झाला, तर मध्य महाराष्ट्रात २० टक्के अधिक पाऊस नोंदला गेला. मध्य सप्टेंबरमध्ये राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी झाली, विशेषतः मराठवाडा आणि सोलापूरमध्ये, ज्यामुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले.
4: जून ते सप्टेंबर या कालावधीत कोणत्या भागात सर्वाधिक पाऊस झाला?
उत्तर: जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत मराठवाड्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. या भागात पावसाने थैमान घातले आणि शेती-घरांचे मोठे नुकसान झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.