
Tourism Advisory: उन्हाळा लागला की थंड हवेच्या ठिकाणी पर्यटन करण्याचा सर्वांनाच मोह होतो. अनेकजण धार्मिक तीर्थाटनासोबत पर्यटनाचे पॅकेज ट्रॅव्हल कंपन्यांकडे बुक करतात. जर आपण आपले पर्यटन ऑनलाइन बुक करत असाल तर सावधान. देशामध्ये अनेकांना ऑनलाइन बुकिंग मध्ये गंडा घालण्यात आलाय. चंद्रकांत बर्वे आणि कल्पना बर्वे अशाच फसवणुकीला बळी पडले.
चंद्रकांत आणि कल्पना बर्वे दोघेही आपल्या मित्र परिवारासोबत थायलंडला फिरायला जाणार होते. यासाठी त्यांनी युनिव्हर्स पॅसेज वेफर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे 50 हजार रुपये जमा केले. त्यांच्याकडे वेळोवेळी पैसे मागण्यात आले. मागितलेल्या रकमानुसार अधिक रक्कमही त्यांनी दिली. मात्र त्यांना थायलंडला नेण्यास कंपनीने टाळाटाळ केली. याबाबत बर्वे यांनी उपनगर पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. मात्र पोलीस अधिकृत फिर्याद नोंदवून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे फसवणाऱ्या टुरिझम कंपन्यांचा चांगलच फावतंय.
नाशिकमध्ये दरवर्षी अशाप्रकारे पर्यटकांकडून एक ते दीड कोटी रुपयांची फसवणूक विविध माध्यमातून केली जाते. नाशिकप्रमाणे देशभरात प्रत्यक्षरात अशा टोळ्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राने निर्देश जारी केले आहेत. देशभरातील धार्मिक यात्रेकरू आणि पर्यटकांना लक्ष्य करून होणाऱ्या ऑनलाइन बुकिंग फसवणुकीबाबत सार्वजनिक अलर्ट जारी करण्यात आलाय. सर्वाधिक फसवणूक तीर्थयात्रांमध्ये होताना दिसतेय, अशी माहिती ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिकचे सचिव
अरुण सूर्यवंशी यांनी दिली.
तुम्हीही पर्यटनासाठी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा. केदारनाथ हेलिकॉप्टर बुकिंग https://www.heliyatra.irctc.co.in द्वारे करता येते. सोमनाथ ट्रस्टची अधिकृत वेबसाइट https://somnath.org ही आहे आणि गेस्ट हाऊस बुकिंग त्याचद्वारे करता येते. बनावट वेबसाइट्स, फसवे सोशल मीडिया पेजेस, फेसबुक पोस्ट आणि गुगलसारख्या सर्च इंजिनवर सशुल्क जाहिरातींद्वारे ही फसवणूक केली जात आहे.
त्यासाठी मंत्रालयाने आणि पर्यटन विभागाने लोकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिलाय. पेमेंट करण्यापूर्वी वेबसाइटची सत्यतापडताळून घ्या. फक्त अधिकृत सरकारी पोर्टल किंवा विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सींद्वारेच बुकिंग करावे. फेसबुक इंस्टाग्राम वरील थेट जाहिरातींना बळी पडू नका. कमी खर्चामध्ये टूर पॅकेजेस आयोजित करणाऱ्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.