
Laxman Hake Attack : ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या कारवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या आरणगाव येथे अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. दरम्यान या हल्ल्यात हाकेंच्या कारच्या काचा फुटल्या आहेत. लक्ष्मण हाकेंना या हल्ल्यात कोणतीही दुखापत
झालेली नाहीय. मागील दिवसांपासन हल्ले सुरूच असून नव्यांदा हल्ला करण्यात आल्याचं हाकेंनी सांगितलं. तर प्रसिद्धीसाठी हाकेंनी स्वत:वर हल्ला करून घेतल्याचा आरोप करत जरांगेंनी त्यांच्यावर टीका केली.
हाकेंवर करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांच्या कारचे मोठं नुकसान झालंय. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढतोय हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल हाकेंनी या हल्ल्यानंतर उपस्थित केलाय. तर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. हाकेच नव्हे तर त्यांचे सहकारी पवन करवरही 24 सप्टेंबरला जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. बीडच्या माजलगावमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेले असताना जमावानं त्यांना बेदम मारहाण केली. दरम्यान या घटनेत पवन कर हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेवरून ओबीसी नेत्यांनी चिंता व्यक्त केलीय.
याआधी देखील लक्ष्मण हाकेंची कार जाळून टाकल्याची घटना घडली होती. तसंच काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंची कारही अज्ञांतांनी जाळल्याची घटना समोर आली होती. महाराष्ट्रात सध्या ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. मराठा आरक्षणाला ओबीसी नेते हाकेंचा विरोध आहे. त्यामुळेच वारंवार हल्ले होत असल्याची शंकाही लक्ष्मण हाकेंनी व्यक्त केलीय.. दरम्यान हल्ल्याची गंभीर दखल घेण्याची मागणी देखील हाकेंनी पोलिसांकडे केलीय.
FAQ
1 लक्ष्मण हाकेंवर हल्ला कुठे आणि कसा झाला?
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंवर अहिल्यानगरच्या आरणगाव येथे अज्ञात व्यक्तींनी जीवघेणा हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या कारच्या काचा फुटल्या आहेत, पण हाकेंना कोणतीही दुखापत झालेली नाही. कारचे मोठे नुकसान झाले आहे.
2 हाकेंनी हल्ल्याबाबत काय सांगितले?
हाकेंनी सांगितले की, मागील दिवसांपासून हल्ले सुरूच आहेत आणि हा नववा हल्ला आहे. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी लढणे हा आमचा गुन्हा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध असल्याने हल्ले होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
3 हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई काय झाली?
पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हाकेंनी हल्ल्याची गंभीर दखल घेण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.