digital products downloads

औंढ्यात जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन: आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन; विविध विषयांवर होणार चर्चासत्र – Maharashtra News

औंढ्यात जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन:  आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते उद्घाटन; विविध विषयांवर होणार चर्चासत्र – Maharashtra News



औंढा नागनाथ येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे २३ वे वार्षिक अधिवेशन व औंढा तालुका ग्रंथालय संघाचे पहिले वार्षिक अधिवेशन मंगळवारी ता. १७ आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विविध विषयांवर चर्चासत्र होणार आहे. औंढा नागनाथ येथील जैन मंदिर येथे आयोजित अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक उपस्थित राहतील. यावेळी निर्मल प्रकाशनचे निर्मलकुमार सुर्यवंशी यांचा सत्कार केला जाईल. यावेळी नगराध्यक्ष कपील खंदारे, उपनगराध्यक्ष मनोज देशमुख, प्राचार्य डॉ. रामेश्‍वर पवार,गुलाब मगर, तेजकुमार झांझरी, डी. बी. देशपांडे, जीवन लोखंडे, अनिल बाविस्कर, सुनिल हुसे, आशिष ढोक पाटील, डॉ. राजशेखर वालेकर, राम मेकले, पांडूरंग पाटील, प्रभाकर कापसे,राजेंद्र हंबीरे, अरविंद लंके पाटील, प्रा. विलास वैद्य, निळकंठ देव उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात शासकिय अनुदाना शिवाय ग्रंथालय आर्थिक सक्षम करण्याचे उपाय यावर चर्चासत्र होईल.यावेळी डॉ. राजशेखर वालेकर, नामदेव दळवी, कल्याण वसेकर, डॉ. विलास खरात उपस्थित राहतील. सुत्रसंचालन प्रा. विजयकुमार जैस्वाल तर सिध्दलिंग किर्तनकार आभार व्यक्त करतील. अधिवेशनाचे दुसरे सत्र दुपारी एक ते दोन यावेळेत होणार असून यावेळी वाचक वाढीसाठी करावयाची उपाय योजना या विषयावर चर्चासत्र होईल. यावेळी डॉ. राजेंद्र सानप, डी.बी. देशपांडे, अशोक अर्धापूरकर, गजानन शिंदे, सुधाकर जाधव, मधुकर सावळे उपस्थित राहतील. या अधिवेशनाचा समारोप दुपारी दोन ते तीन यावेळेत होणार असून अध्यक्षस्थानी प्रा. जी. पी. मुपकलवार यांची उपस्थिती राहणार आहे. योळी सुनील हुसे, विनोद कावडे, विश्‍वनाथ डोंगरे, विश्‍वनाथ गवारे, मारोती कदम, संतोष ससे उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघ व औंढा नागनाथ तालुका ग्रंथालय संघाचे मारोती कदम, मधुकर सांगळे, मधुकर सावळे, संभाजी किर्तने, कानबाराव पोले यांनी केले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp