
Aurangzeb Tomb Raj Thackeray Demand: औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये भाष्य केलं. यावेळेस त्यांनी या कबरीच्या आजूबाजूची सजावट हटवण्याची मागणी केली आहे. असं असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी या विधानावरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी नागपूरमधील संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना राज ठाकरेंनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करताना, “भारताच्या उदारतेचं आणि सर्व सामावेशकतेचं हे प्रतीक आहे,” असं मत नोंदवलं.
राज ठाकरे औरंगजेबच्या कबरीबद्दल नेमकं काय म्हणाले?
“औरंगजेबाची कबर सजवली आहे ती सजावट काढा आणि तिथे लिहा की आम्हा मराठ्यांशी लढायला आलेल्या औरंगजेबाला आम्ही इथेच गाडला,” असं राज ठाकरेंनी दसरा मेळाव्यात म्हटलं. “मराठ्यांनी ज्यांना ज्यांना गाडलंय त्यांची प्रतीकं उखडून चालणार नाही, उलट आपण जगाला ओरडून सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाकोणाला गाडलंय ते! शाळेपासून लहान मुलांना दाखवलं पाहिजे जोशींनी आपल्या धर्माला भ्रष्ट करणाऱ्या औरंजेबाला गाडला. माझी महाराष्ट्रातील तरुण-तरुणींना विनंती आहे की इतिहास व्हाट्सअप वर वाचू नका. इतिहास तुम्हाला जातीतून शिकवायचा प्रयत्न केले जातात त्यामागे कुठलातरी राजकीय पक्ष असणार आहे. तुम्ही एकमेकांच्यात भांडता आणि हे कामं उरकून घेतात,” अशा शब्दांमध्ये राज ठाकरेंनी राजकारण्यांचा समाचार घेतला.
राज ठाकरेंच्या विधानावर भैय्याजी जोशींची
राज ठाकरेंनी केलेल्या या टीकेवरुन भैय्याजी जोशींनी प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “औरंगजेबाचा कबरीचा विषय अनावश्यक आहे. त्याचा मृत्यू इथे झाला त्याची कबर बनली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, त्यांनी अफजल खानाची कबर बनवली. भारताच्या उदारतेच आणि सर्व समावेशकतेचे हे प्रतीक आहे, कबर राहो ज्याला जायचा आहे तो जाईल,” असं भैय्याजी महाराज म्हणाले.
मोदींच्या सेवेचं केलं कौतुक
मोदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या संघाच्या मुख्यालयातील कार्यक्रमासंदर्भात बोलताना, “पंतप्रधानाचा कालचा कार्यक्रम चांगला झाला. सेवेसंदर्भात त्यांची रुची कोरोना काळात पाहिली. त्यांनी कोरोना काळात ऊर्जा प्रदान करण्याचं काम केलं. माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन त्याच्या हस्ते झाले. लवकरच तो प्रकल्प पूर्ण होईल,” असं भैय्याजी जोशी म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.