
नागपूर येथील हिंसाचारानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादे येथील औरंगजेबाच्या कबरीला कडेकोट बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. या कबरीकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग केली आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचीही तपासणी केली जात आह
.
औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून सध्या महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर उखडून फेकण्याचा इशारा दिला आहे. त्यातच नागपूर येथे या प्रकरणी मोठी दंगल झाल्यामुळे खुलताबाद येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी खबरदारी म्हणून, औरंगजेबाच्या कबरीला चारही बाजूंनी बंदबोस्त लावला आहे. खुलताबाद शहरात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेडिंग लावून वाहनांची, पर्यटकांची व नागरिकांची चौकशी केली जात आहे.
कबरीला भेट देणाऱ्या पर्यटकांची कसून चौकशी
विशेषतः औरंगजेबाची कबर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचे नाव, मोबाईल नंबर व आधार कार्ड तपासले जात आहे. तसेच त्याची नोंदही घेतली जात आहे. कबर परिसरात मोबाईल नेण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारामुळे कबरीला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, रविवारी 70 पर्यटकांनी या कबरीला भेट दिली. त्यानंतर सोवारी 60 व मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत केवळ 9 पर्यटकांनी या कबरीला भेट दिली. यासंबंधीची आकडेवारी पोलिसांच्या नोंदवहीत उपलब्ध आहे.
कबर परिसरात मोठा बंदोबस्त

नागूपर येथे सोमवारी रात्री औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्यावरून मोठा हिंसाचार झाला. त्याचे पडसाद खुलताबाद येथे उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून येथे मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सद्यस्थितीत या ठिकाणी 1 उपविभागीय पोलिस अधिकारी, 3 पोलिस निरीक्षक, 1 एसआरपीएफची तुकडी यासह अनेक साध्या वेशातील पोलिस, 120 हून अधिक होमगार्ड जवान व स्थानिक पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी तैनात करण्यात आलेत. यामुळे कबर परिसराला छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
हे ही वाचा…
नागपूर दंगल एका मोठ्या कटाचा भाग:राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम -प्रकाश आंबेडकर
मुंबई – बजरंग दल व विहिंपच्या आंदोलनानंतर नागपुरात झालेल्या दंगलीमुळे अवघ्या राज्याचे राजकारण तापले आहे. वंचित बहजुन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवरून राज्य सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यांनी राज्यातील एका विषारी मंत्र्याकडून दररोज समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत नागपूरची दंगल एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.