
औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पतित पावन संघटनेच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात आंदोलनकर्त्यांकडून मोठी चूक झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी औरंगजेबाऐवजी चक्कत मुघल बादशहा बहादूर शाह यांचा फोटो जाळला. ‘पतित पावन’च्य
.
राज्यात सध्या औरंगजेबावर मोठा वाद सुरू असून वातावरण तापले आहे. आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गुणगान गायल्यानंतर विविध संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. औरंगजेब एक क्रूर शासक होता आणि हिंदू धर्मीयांवर अत्याचार करणारा बादशहा होता, असे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे औरंगजेबाचा गौरव करणाऱ्या वक्तव्यांवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर रविवारी पुण्यात पतीत पावन संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र, यावेळी औरंगजेबाऐवजी बहादूर शाह जफार यांचा फोटो जाळण्याची चूक घडली.
पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाच्या उदात्तीकरणाचा निषेध करण्यासाठी पुण्यात आंदोलन केलं. मात्र, या आंदोलनादरम्यान आंदोलकांकडून मोठी गफलत घडली. आंदोलकांनी औरंगजेब समजून चक्क मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांच्या फोटोला चपलांचा हार घालून तो जाळला. या चुकीमुळे आता या आंदोलनाची चर्चा रंगली आहे.
पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लाल महाल चौकात औरंगजेबविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परकीय आक्रमक आणि क्रूर शासक असलेल्या औरंगजेबाचा उदो उदो करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. मात्र, आंदोलकांकडून मोठी चूक झाली आणि त्यांनी औरंगजेबाऐवजी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर याचा फोटो जाळण्यात आल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून, अनेक जण यावर टीका करत आहेत. तर काहींनी हा प्रकार अज्ञानातून झाल्याचे सांगितले.

अनवधानाने चूक झाल्याचे संघटनेने केले मान्य
दरम्यान, आमच्या कार्यकर्त्याने चुकून चुकीचा फोटो छापून आणला. आम्हाला औरंगजेबाच्या उदात्तीकरण करणाऱ्यांचा विरोध करायचा होता आणि औरंगजेबाचा फोटो जाळायचा होता, असे स्पष्टीकरण पतीत पावन संघटनेने दिले आहे. तसेच, आपल्याकडून अनवधानाने ही चूक झाल्याचेही आंदोलकांनी मान्य केले आहे.
बहादूर शाह जफर कोण होते?
बहादूर शाह जफर हे मुघल साम्राज्याचे शेवटचे सम्राट होते. 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी ब्रिटिशांविरोधात मोठी भूमिका बजावली होती. ब्रिटिशांनी त्यांना कैद करून रंगून येथे पाठवले होते. त्यांनी आपले उर्वरित आयुष्य रंगून येथेच काढले आणि तिथेच त्यांचे निधन झाले. त्यांचा औरंगजेबाशी कोणताही संबंध नव्हता.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.