
Karjat Youth Body Found: कर्जतच्या जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मृतदेह एका जवानाचा असल्याची माहिती समोर येतेय. मुंबई लगतच्या जंगलात जवानाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. नौदलाची टीम जंगलात सापडलेल्या मृतदेहाची माहिती घेणार असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलात कार्यरत असलेल्या सूरजसिंह चौहान हा जवान काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाला होता. या जवानाची 29 मे रोजी मुंबईच्या एफ.टीटीटी विभागात नेमणूक झाली होती. मात्र गेल्या आठ दिवसांपासून हा जवान बेपत्ता होता.
मागील आठ दिवसांपुर्वी सदर जवान हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या जवानाचा शोध त्याच्या मोबाईल लोकेशननुसार सुरू होता. त्यानंतर त्याचे लास्ट लोकेशननुसार रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपूरी रोड स्टेशन परिसरातील एका जंगलात एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नेरळ पोलिसांच्या पथकाला हाती लागला आहे. मात्र हा मृतदेह त्याच नौदल जवानाचा आहे का याचा शोध घेतला जात आहे.
7 सप्टेंबरपासून कोणताही संपर्क न होऊ शकलेल्या सूरज यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत धाव घेतली होती. सूरजा बेपत्ता असल्याची तक्रार त्यांनी नोंदवील. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या शेवटच्या लोकेशनवरुन जिल्हा यंत्रणा यांच्याकडून तपास सुरू केला. मात्र या आठ दिवसांत एकदाही त्याचा फोन सुरु झाला नाही. अखेर त्याच्या तपासासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला.
अखेर आज या तरुणाचा मृतदेह माथेरान डोंगरातील पाली भूतिवली धरण ते गार्बेट या मार्गावरील जंगलात आढळून आला. स्थानिक आदिवासी व गुराखी यांना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात माहिती दिली. मात्र हा मृतदेह सुशांत यांचाच आहे का याची चाचपणी सुरू आहे.
FAQ
1. कर्जत जंगलात सापडलेल्या मृतदेहाबाबत काय घटना आहे?
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जंगलात एका तरुणाचा मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह मुंबईच्या कुलाबा डॉकयार्ड नौदलात कार्यरत असलेल्या जवान सूरजसिंह चौहान यांचा असल्याची शक्यता आहे. ही घटना धक्कादायक असून, नौदलाची टीम तपासासाठी येणार आहे.
2. सूरजसिंह चौहान हे कोण होते आणि त्यांची नेमणूक कधी झाली?
सूरजसिंह चौहान हे दक्षिण मुंबईतील कुलाबा येथील डॉकयार्ड नौदलात जवान होते. त्यांची २९ मे रोजी मुंबईच्या एफ.टी.टी.टी. विभागात नेमणूक झाली होती. ते काही दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाले होते.
3. जवान कधी बेपत्ता झाले आणि नातेवाईकांनी काय केले?
सूरजसिंह चौहान हे गेल्या आठ दिवसांपूर्वी (७ सप्टेंबरपासून) बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि कोणताही संपर्क नसल्याने चिंता व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.