
Pune Manache 5 Ganpati Chatrapati Shivaji Maharaj Connection: पुण्यातील पाचही मानाचे गणपती विराजमान झाले असून पुढील 10 दिवस राज्याची संस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये गणेशोत्सवाची धूम असणार आहे. पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं दर्शन घेण्यासाठी देशोविदेशातून गणेशभक्त पुण्यात येतात. मात्र या मानाच्या गणपतींबद्दल अनेकदा आक्षेपही घेतला जातो. हे मानाचे गणपती आहेत असं कोणी ठरवलं? देवादेवांमध्ये भेदभाव का? असे सवाल टीकाकारांकडून विचारले जातात. मात्र या टीकेला आता मानाच्या गणपतींपैकी अग्रस्थानी असलेल्या कसबा गणपतीच्या मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनीच उत्तर दिलं आहे. विशेष म्हणजे या मानाच्या गणपतींचं छत्रपती शिवाजी महाराजांशी असलेलं कनेक्शनही शेटे यांनी अधोरेखित केलं आहे.
मानाचे गणपती कोणी ठरवले?
काही आठवड्यांपूर्वी कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष असलेल्या शेटे यांनी ‘द पोस्टमन’ या मराठी पॉडकास्टमध्ये मुलाखत दिली. यावेळेस त्यांना मानाचे पाच गणपती कसे ठरले यासंदर्भात प्रकाश टाकण्यास सांगितलं. त्यावर त्यांनी, “ज्यावेळेला सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि सार्वजनिक मुरवणुकीचा विषय आला त्यावेळेला रे मार्केट म्हणजेच आताचा फुले मार्केट म्हणजेच मंडईमध्ये यावेळेला जी काही चर्चा झाली त्यावेळी तत्कालीन जो काही ब्रह्मवृंद होता, लोकमान्य होते. खाजगीवाले होते, भाऊसाहेब रंगारी होते. घोटवडेकर होते. यांनी मिळवून ठरवलं होतं की मिरवणुकीत अग्रक्रम, पहिला नाही अग्र!” असं उत्तर दिलं.
…म्हणून तांबडी जोगेश्वरी दुसऱ्या स्थानी
“पहिला शब्द आपल्याला आता कळतो, त्यावेळेस अग्रक्रम हा ग्रामदैवत कसबा गणपती असल्यामुळं त्याला आणि ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी असल्यामुळे त्याला दुसरा मान दिला गेलेला. त्या क्रमाची सक्षम व्यवस्था 132 वर्ष आतापर्यंत एकगम अव्याहत चालू आहे. प्रत्येक गणपती हा मानाचा गणपती आहे. अग्र गणपती जो आहे मिरवणुकीत तो कसबा गणपती आहे,” असंही शेटे यांनी स्पष्ट केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचं कनेक्शन काय?
पुढे बोलताना शेटे यांनी, “मी गेले 8-15 दिवस ऐकतो की हे कसले मानाचे? हा कसला मान? तर यांना कळत नाहीये की ज्या वेळेला बालराजे शिवाजी महाराज आणि आऊसाहेब ज्यावेळेस पुण्यामध्ये आलेल्या त्यावेळेला या गणपतीची पुन:प्राणप्रतिष्ठापना केली. ग्रामदैवतेचा दर्जा त्यांनी दिलेला आहे. हा गणपती इथं असतो म्हणून पहिला मान हा कसबा गणपतीला दिलेला आहे. हा ग्रामदैवताचा छत्रती शिवाजी महाराजांनी दिलेला हा मान आहे. त्याच्यावर जर तुम्ही शंका उपस्थित करत असाल तर हे खरंच खूप खेदजनक आहे,” असं म्हणत खंत व्यक्त केली.
FAQ
पुण्यातील मानाचे पाच गणपती कोणते आहेत?
पुण्यातील मानाचे पाच गणपती आहेत: कसबा गणपती (प्रथम), तांबडी जोगेश्वरी (दुसरा), गुरुजी तालीम (तिसरा), तुळशीबाग गणपती (चौथा), आणि केसरीवाडा गणपती (पाचवा).
मानाचे गणपती कोणी आणि कसे ठरवले?
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीला, मंडई (फुले मार्केट) येथे झालेल्या चर्चेत लोकमान्य टिळक, भाऊसाहेब रंगारी, खाजगीवाले, आणि घोटवडेकर यांनी एकमताने मिरवणुकीचा क्रम ठरवला. कसबा गणपतीला ग्रामदैवत म्हणून अग्रक्रम (प्रथम स्थान) आणि तांबडी जोगेश्वरीला दुसरे स्थान देण्यात आले.
कसबा गणपतीला प्रथम मानाचा गणपती का म्हणतात?
कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत आहे. मिरवणुकीत त्याला अग्रक्रम देण्याचा निर्णय सार्वजनिक गणेशोत्सवाच्या सुरुवातीला घेतला गेला, आणि ही परंपरा गेल्या 132 वर्षांपासून अव्याहत चालू आहे.
तांबडी जोगेश्वरीला दुसरा मान का मिळाला?
तांबडी जोगेश्वरी हा पुण्याचा दुसरा ग्रामदैवत आहे. त्यामुळे मिरवणुकीत कसबा गणपतीनंतर तांबडी जोगेश्वरीला दुसरे स्थान देण्यात आले, ज्याला “मनाचा दुसरा” असेही म्हणतात.
मानाच्या गणपतींच्या क्रमाबाबत कोणत्या टीका होतात?
काही टीकाकारांचे म्हणणे आहे की, मानाचे गणपती ठरवणे म्हणजे देवादेवांमध्ये भेदभाव करणे आहे. “हे मानाचे गणपती कोणी ठरवले?” आणि “हा कसला मान?” असे सवाल उपस्थित केले जातात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.