digital products downloads

कसाबखेड्यात 7 पर्यंत चालले मतदान: जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सदस्यांसाठी निवडणूक, मतदारांनी लावल्या रांगा‎ – Chhatrapati Sambhajinagar News

कसाबखेड्यात 7 पर्यंत चालले मतदान:  जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या सदस्यांसाठी निवडणूक, मतदारांनी लावल्या रांगा‎ – Chhatrapati Sambhajinagar News



तब्बल आठ वर्षांनंतर झालेल्या या ग्रामीण निवडणुकीमुळे उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य दिसून आले. मात्र, मतदानादरम्यान मतदार यादीतील त्रुटी, मतदान केंद्रांच्या गैरसोयी व दिव्यांग सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या समोर आल्या. तालुक्यातील काही मतदान केंद्रांवर ओळखपत्र (व्होटर आयडी) असूनही मतदार यादीत नावे नसल्याने अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. काही ठिकाणी पोलिंग एजंटांकडून चुकीचे सिरियल नंबर दिले जात असल्याने मतदारांची नावे शोधताना वेळ लागत होता, त्यामुळे मतदान प्रक्रियेला विलंब झाला. ३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. खांडीपिंपळगाव- जाफरवाडी ही ग्रुप ग्रामपंचायत असली तरी जाफरवाडी हे गाव खांडीपिंपळगावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही गावांसाठी मतदान केंद्र खांडीपिंपळगाव येथेच निश्चित करण्यात आल्याने जाफरवाडीतील २६८ मतदारांना दीड किलोमीटरचा प्रवास करून मतदानासाठी जावे लागले. स्वतंत्र मतदान केंद्र नसल्याने जाफरवाडीतील मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. खांडीपिंपळगाव येथील अन्वर अमीर पठाण यांच्याकडे ओळखपत्र असूनही मतदार यादीत नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले. बाजारसावंगी, गदाना व वेरूळ हे जिल्हा परिषदेचे तीन गट असून पंचायत समितीचे बाजारसावंगी, टाकळी राजेराय, गदाना, ताजनापूर, वेरूळ व गल्लेबोरगाव हे सहा गण आहेत. तालुक्यातील १०४ मतदान केंद्रांवर एकूण ८५,३०७ मतदारांपैकी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषदेच्या तीन गटांतील ११ उमेदवारांचे, तर पंचायत समितीच्या सहा गणांतील २४ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. सकाळी ११ वाजेपर्यंत २८ ते ३० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढत गेला. संध्याकाळी साडेपाच वाजल्यानंतरही टाकळी राजेराय, खिर्डी, कसाबखेडा, गल्लेबोरगाव, वेरूळ आदी गावांत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. काही केंद्रांवर रात्री साडेसात- आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. कसाबखेडा, टाकळी राजेराय, गदाना, वेरूळ, बाजारसावंगी, गोळेगाव, कागजीपुरा, खिर्डी, गल्लेबोरगाव, घोडेगाव, येजगाव आदी गावांत मतदानाची टक्केवारी इतर गावांच्या तुलनेत अधिक नोंदवली गेली. सालुखेडा व सराई येथे प्रत्येकी एक मतदान केंद्र असतानाही काही मतदारांची नावे परस्पर बदलण्यात आली. सराई येथील किमान १९ ते २० मतदारांची नावे सालुखेडा मतदान केंद्रावर, तर सालुखेडा येथील काही मतदारांची नावे सराई मतदान केंद्रावर जोडण्यात आल्याने मतदारांना गाव बदलून मतदानासाठी जावे लागले. सायंकाळीही अनेक गावांत होत्या रांगा ३५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp