
सीमा आढे, झी 24 तास, मुंबई: 30 ऑगस्ट रोजी कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी राजेंद्र कदम सेनानिवृत्त होत असल्याने निवृत्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने कदम यांनी आपल्या सहकाऱ्यांना पुस्तके भेट म्हणून दिली. मात्र ही पुस्तके स्वीकारण्यास सहकाऱ्यांनी विरोध केला. ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ आणि देशाचे ‘दुश्मन’ अशी दोन पुस्तके वाटली. मात्र ही पुस्तके घेण्यास कर्मचाऱ्यांनी विरोधात केला तसेच याबाबतचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे त्या व्हिडिओमध्ये एक महिला कर्मचारीने ही पुस्तके कदम यांच्या अंगावर फेकली. या महिलेने प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाला विरोध केलाय असे या व्हिडीओतून दाखवण्याचा प्रयत्न झाला.
पुस्तके फेकतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे तसेच ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. संबंधित महिलेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली.
वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये महिला कर्मचारी आणि राजेंद्र कदम यांच्यात शब्दित चकमक ऐकल्यास ती संबंधती महिला प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाला विरोध करत असल्याचे दिसतेय. मात्र या व्हिडीओ मागची कहाणी वेगळीच समोर आली…
आम्हाला ही पुस्तके देण्यामागचे हेतू काय आहे? प्रबोधनकार आलेत का आम्हाला पुस्तके देण्यासाठी? तुम्ही तुमचं नाव टाकून का वाटप करत आहात? तुमचं हेतू काय? आम्ही असली पुस्तके घेणार नाहीत
प्रबोधनकार ठाकरे यांचं हे पुस्तक आहे , तुम्हाला नसेल घ्यायचं तर नका घेऊ. मला यावर काहीच नाही बोलायचे.
त्यांच्यात हे संभाषण सुरू असताना त्या महिलेने पुस्तके अंगावर फेकली. हा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर वादाला सुरुवात झाली.
तातडीने या बातमीची दाखल घेत मनसेच्या नेत्यांनी कस्तुरबा रुग्णालय गाठत डिनसोबत याविषयी चर्चा केली.
प्रकरण तापत असताना रुगालयातून वेगळीच माहिती समोर आली. कक्ष अधिकारी असलेल्या राजेंद्र कदम यांच्या विरोधात 65 कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाला पत्र लिहून तक्रार केली होती.
ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कस्तुरबा रुग्णालयाला भेट दिली. या दरम्यान संबंधित महिला कर्मचारी व रुग्णालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण प्रकरण जाणून घेतल्यानंतर किशोर पेडणेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी त्या महिलेला समर्थन देत राजेंद्र कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करत बाहेर आले.
किशोर पेडणेकर म्हणाल्या, देशाचे ‘दुश्मन’ हे पुस्तक बॅन असताना वाटण्याचे कारण काय? प्रबोधनकार ठाकरे यांचा या महिलांनी विरोध केला नाही. स्वातंत्र्यपूर्वीचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे कव्हर बघितल्यानंतर पुस्तकाला महिलांनी नकार दिला. फेकून देणे व नाकारणे यात फरक आहे. कदम हा व्यक्ती आधीपासून वादग्रस्त आहे. स्वातंत्र्यपूर्वीचे पुस्तक देऊन कदमला काय मिळवायचे आहे? जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे स्वागत पेडणेकरांनी पुस्तकार नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या.
रुग्णालयातील परिचारिका म्हणाल्या, पुस्तकाला आमचा विरोध असताना देखील बळजबरीने पुस्तके वाटण्यात आली. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा आम्ही अपमान केला नाही. आम्ही त्यांचं आदर करतो. आज बाळासाहेबांचे आम्ही मराठी म्हणून ताठ मान करून काम करतोय. त्यांचे प्रबोधनकार ठाकरे हे वडील आहेत. आमच्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.
कदम हे रुग्णालयात सेवेत असताना काही ना काही कारणाने वादग्रस्त ठरायचे. देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ आणि देशाचे ‘दुश्मन’ या दोन्ही पुस्तकांच्या कव्हरवर स्वतःचे नाव टाकून पुस्तके वाटली. पुस्तके देण्यामागची नक्की उद्देश काय? असा सवाल उपस्थित करत कर्मचाऱ्यांनी पुस्तके नाकारल्याचे रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र या कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाचा विरोध केला या भूमिकेवर राजेंद्र कदम ठाम आहेत. किशोरी पेडणेकर यांनी पूर्ण घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर तूर्तास या प्रकरणावर पडदा पडला आहे.
FAQ
प्रश्न: कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप वादाची सुरुवात कशी झाली?
उत्तर: ३० ऑगस्ट रोजी कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांच्या निवृत्ती सोहळ्यात सहकाऱ्यांना ‘देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे’ आणि ‘देशाचे दुश्मन’ ही पुस्तके भेट म्हणून दिली गेली. मात्र, कर्मचाऱ्यांनी ही पुस्तके स्वीकारण्यास नकार दिला. एका महिला कर्मचाऱ्याने पुस्तके कदम यांच्या अंगावर फेकली, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाने आक्रमक प्रतिक्रिया दिली आणि महिलेवर कारवाईची मागणी केली.
प्रश्न: व्हायरल व्हिडिओतील संभाषण आणि वादाचे खरे कारण काय होते?
उत्तर: व्हिडिओमध्ये महिला कर्मचारी आणि कदम यांच्यातील संभाषणात महिलेचा हेतूबाबतचा प्रश्न होता: “अम्हाला ही पुस्तके देण्यामागचे हेतू काय? प्रबोधनकार आलेत का? तुम्ही तुमचे नाव टाकून का वाटप करत आहात?” कदम यांनी उत्तर दिले की, “प्रबोधनकार ठाकरे यांचे हे पुस्तक आहे, नसेल घ्यायचे तर नका घ्या.” यानंतर पुस्तके फेकली गेली. कर्मचाऱ्यांचा विरोध पुस्तकांच्या कव्हरवर कदम यांचे नाव आणि वाटपाच्या उद्देशावर होता, न की ठाकरे यांच्या पुस्तकावर.
प्रश्न: प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी आणि शेवट कसा झाला?
उत्तर: कदम यांच्या विरोधात ६५ कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाला तक्रार पत्र दिले होते, कारण ते सेवेत असताना वादग्रस्त ठरत. ठाकरे गटाच्या नेत्यांनी रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटना समजून घेतल्यानंतर महिलेला आणि कर्मचाऱ्यांना समर्थन दिले. किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, ‘देशाचे दुश्मन’ हे पुस्तक बॅन असताना वाटपाचे कारण काय? आणि फेकणे व नाकारणे यात फरक आहे. कर्मचाऱ्यांनी ठाकरे यांचा आदर असल्याचे सांगून दिलगीरी व्यक्त केली. कदम यांच्या भूमिकेवर ते ठाम असले तरी, पेडणेकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रकरण तूर्तास शांत झाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.