digital products downloads

काँग्रेसचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना आव्हान: शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा – Maharashtra News

काँग्रेसचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना आव्हान:  शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा – Maharashtra News



‘मी छत्रपतींची औलाद आहे, वेळ आली तर कुणालाही सोडणार नाही’, अशा शब्दांत विरोधकांविरोधात डरकाळी फोडणाऱ्या मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना काँग्रेसने शिवरायांचा कथित अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुरस्काराला विरोध करण्याचे आव्हान दिले आहे. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा, असे काँग्रेसने म्हटले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रचारसभेत बोलताना विरोधकांवर कडाडून हल्ला चढवला होता. मी माझा मतदारसंघ व तालुका सोडून कुठेही जात नाही. काहीजण स्वप्न पाहत आहेत, पण मी त्यांना ठासून सांगतो की, 2029 ची स्वप्ने जावळीत पाहू नका. गरज नसताना कुणी माझ्या नादाला लागले तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे हे लक्षात ठेवा. वेळ आली तर मी कुणालाच सोडणार नाही, असे ते म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसने त्यांच्या या विधानाचा दाखला देत त्यांना शिवरायांचा अवमान करणाऱ्या माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पुरस्काराला विरोध करण्याचे आव्हान दिले आहे. छत्रपतींची औलाद तेव्हा जागी झाली असती तर… महाराष्ट्र काँग्रेसने आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, आ. शिवेंद्रराजे जी, आपल्यातील “छत्रपतींची औलाद” विकृत कोश्यारी ने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं. आपल्या राजांना शिव्या देणारा छिंदम, प्रशांत कोरटकर, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणारा प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी, राजांच्या आग्रा मोहिमेचं असंबद्ध वर्णन करणारा राज्याचा मंत्री मंगलप्रसाद लोढा, महाराजांच्या पुण्यतिथीला ढोल वाजवणारा तत्कालीन मंत्री विनोद तावडे…या प्रत्येक घटना आणि वक्तव्यावेळी आपल्यातील “छत्रपतींची औलाद” जागी व्हायला हवी होती, शिवप्रेमींनी आपल्याला डोक्यावर घेतलं असतं. आपल्या माहितीसाठी ही सगळी मंडळी भाजप व त्यांच्याशी संबंधित असलेल्या विचारांची आहेत. तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजप च्या चरणी अर्पण केला नसेल तर कोश्यारी च्या पुरस्काराला विरोध करा. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ भाजप नेत्यांचा उघड उघड विरोध करा, असे काँग्रेसने म्हटले आहे. साताऱ्यात सर्वत्र भाजपचा झेंडा – शिवेंद्रराजे उल्लेखनीय बाब म्हणजे शिवेंद्रराजे भोसले यांनी एका प्रचारसभेत बोलताना आज साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी भाजपचा झेंडा फडकत असल्याचा दावा केला होता. ते म्हणाले होते, घरातील माणसाला जसं संकटात एकटं सोडलं जात नाही, तसं मी साताऱ्याला कधीही सोडलं नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे केवळ सत्ता भोगली, त्यांनी साताऱ्याला काय दिलं, हा प्रश्न आज जनतेने विचारायची वेळ आली आहे. नगरपालिका असो, नगरपंचायत असो, सहकारी संस्था असोत किंवा छोट्या-मोठ्या निवडणुका आज साताऱ्यात प्रत्येक ठिकाणी भाजपाचा झेंडा फडकतो आहे. हे यश कुणाच्या भीतीमुळे नाही, कुणाच्या कृपेने नाही; हे यश विकासामुळे आणि भाजपाच्या ताकदीमुळे आहे. सातारा जिल्ह्याचा विकास पाहायचा असेल तर भाजपाशिवाय पर्याय नाही, असे ते म्हणाले होते.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp