
अजिंठा बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड पोलिसांना शरण आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. जामीन मिळविण्याचे सर्वच दरवाजे बंद झाल्यानंतर अखेर त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. मेडिकल
.
नेमके प्रकरण काय?
अजिंठा अर्बन बँकेत 2006 ते 2023 दरम्यान 97 कोटी 41 लाख रुपयांच्या घोटाळा झाला. या प्रकरणी बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांच्यासह बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राजकीय क्षेत्रात प्रतिष्ठित समजले जाणारे माजी आ. झांबड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने ते फरार झाले होते. शहरातील अनेक भागात तसेच अनेक सोहळ्यांमध्येही ते दिसून आले होते. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेला ते सापडलेच नाहीत. अजिंठा बँकेचे झांबड यांनी 60 कोटी भरल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली.
हे आहेत आरोपी…
बँकेचे चेअरमन सुभाष माणकचंद झांबड, संचालक घेवरचंद मोतीलाल बोथरा, तनसुख माणकचंद झांबड, नवीनचंद संघवी, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, संजय फुलफगर, हरीश भिकचंद चिचाणी, सुशील बलदवा, महेश मन्साराम जसोरिया, सोपान तुळशीराम शेजवळ, उमेश डोंगरे, माणिक चव्हाण, रजनी देसरडा, माधुरी अग्रवाल, अनिल धर्माधिकारी, रवींद्र वाणी, संजय मिठालाल कांकरिया, शिरीष गादिया, दादासाहेब गंडे, नितीन रतनलाल मुगदिया, विद्या प्रफुल्ल बाफणा, कांचन श्रीमंतराव गोर्डे, अब्दुल पटणी, सुनील शंकरलाल सवईवाला, दिलीप हिराचंद कासलीवाल, बँकेचे सीईओ प्रदीप एकनाथ कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादिया, दीपाली देवेंद्र कुलकर्णी.
हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.