
भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाबाबत मोठे विधान केले आहे. काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव आणि आजारपण यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले, असे केंद्रीय
.
मुंबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांच्या बिनविरोध निवड करण्यात आली. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी याबाबतची घोषणा केली. यावेळी बोलताना किरेन रिजिजू यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनामागील कारणांवर उपरोक्त मोठे विधान केले.
नेमके काय म्हणाले रिजिजू?
लोकसभा निवडणुकीत भाजपला मत मिळाली नाही. संविधानाला वाचविण्यासाठी भाजपला मत देऊ नका असे आम्हाला सांगण्यात आल्याचे काही दलित बांधवांनी मला सांगितल्याचा दावा किरेन रिजिजू यांनी केला. तसेच बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग कधीही काँग्रेसला मत देणार नाही. काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलेले आहे, असेही ते म्हणालेत. काँग्रेसने दिलेले टेन्शन, दोन वेळा झालेला पराभव यामुळे बाबासाहेब आपल्याला वेळेआधी सोडून गेले, असे विधानही त्यांनी केले.
मोदींनी दलिताला बाबासाहेबांच्या खुर्चीवर बसवले
बाबासाहेबांना भाजप पुरस्क्रुत सरकारने भारतरत्न हा पुरस्कार दिला. बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 71 वर्षानंतर पंतप्रधान मोदींनी मला कायदामंत्री केले. दलित व्यक्तीला बाबासाहेबांच्या खुर्चीवर बसवण्याची संधी मोदींनी दिली. संविधान दिवस साजरा करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला. आम्ही पक्ष आणि देशाच्या संविधानाचा सन्मान करतो, असे किरेन रिजिजू म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांना प्रदेशाध्यक्ष केल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जीन्स पॅन्ट घालून सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळे रवींद्र चव्हाण यांना अध्यक्ष बनवले आहे.
हे ही वाचा…
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी फडणवीसांचे विश्वासू रवींद्र चव्हाण:कोणीही अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध निवड, ठरले पक्षाचे बारावे प्रदेशाध्यक्ष
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या भाजप प्रदेशाध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाली आहे. मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी निरीक्षक असलेले केंद्रीयमंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, विनोद तावडे यासह भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. पूर्ण बातमी वाचा…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.