
शहरातील गणेश विसर्जनासाठी कादवा नदीतीरी नगरपरिषद व पोलिस प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या दोन्ही विभागाचे एकूण २०० कर्मचारी कादवा नदी तीरावर तैनात करण्यात येणार आहे.
.
पिंपळगाव शहर व परिसरात सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी सकाळी आठ ते दुसऱ्या दिवशी रात्री दोनपर्यंत कादवा नदीतीरावर नगरपरिषदेतर्फे तराफ्याची सोय करण्यात येणार आहे. घोडकेनगर व चिंचखेडरोड येथे कृत्रिम तलावाचे नियोजन करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील पथदीप दुरुस्ती व खड्डे पूर्णपणे बुजवण्यात येणार आहे.
^पिंपळगाव पोलिसांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह नाशिक ग्रामीण पोलिस दलातील कर्मचारी सुद्धा तैनात करणार असल्याने भाविकांनी ही मिरवणूक शांततेत पार पाडावी. -प्रदीप देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपळगाव
^नगरपरिषदेतर्फे कादवा तीरावर मूर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. ज्या भाविकांना मूर्ती संकलित करता येतील, त्यांनी या ठिकाणी मूर्तींचे दान करावे. तसेच तराफ्यावर येण्याचा कोणत्याही भाविकांनी आग्रह करू नये. – संदीप चौधरी, मुख्याधिकारी
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.