
केंद्रीय ट्रेड युनियन्सनी घोषित केलेल्या बुधवार, ९ जुलैच्या संपाला अमरावतीत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आयटक, सीटू आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वातील अनेक युनियन्सच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संपात सहभागी होत केंद्र व राज्य
.
मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. आजचा बुधवारही त्याला अपवाद ठरला नाही. त्यामुळे भर पावसात कामगार, कर्मचाऱ्यांनी इर्विन चौकात एकत्र येत सरकारविरुद्धचा रोष व्यक्त केला. दुपारी १ च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर कामगार, कर्मचाऱ्यांनी मोर्चा प्रारंभ केला. ज्येष्ठ कामगार नेते तथा भाकपच्या राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य कॉम्रेड तुकाराम भस्मे, आयटकचे जे. एम. कोठारी, प्रा. डॉ. ओमप्रकाश कुटेमाटे व निळकंठ ढोके, मध्यवर्ती कामगार संघटनेचे डी. एस. पवार, किसान सभेचे नेते अशोक सोनारकर, सीटूचे सुभाष पांडे, सुनील देशमुख व रमेश सोनुले, एमएमई वर्कर्स फेडरेशनचे महेश जाधव आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
कामगार, कर्मचाऱ्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक प्राप्त केलेले अनेक अधिकार केंद्र शासनाने गुंडाळले आहेत. नव्या कामगार संहितेच्या नावाखाली कामगारांचा संप, आंदोलनाचा हक्कही हिरावून घेतला जात आहे. त्याचवेळी राज्य शासनाने ‘जनसुरक्षा विधेयक’ च्या माध्यमातून उरल्या-सुरल्या सर्व आशा-अपेक्षा हिसकावण्याचा प्रयत्न चालवला असून यापुढे आंदोलन होऊच नये, अशा पद्धतीची तयारी सुरु केली आहे. या सर्व बाबींना कामगार-कर्मचाऱ्यांनी कडाडून विरोध चालवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा संघर्ष सुरु असून येत्या काळात या संघर्षाची धार अधिक तीव्र केली जाईल, अशी घोषणा त्यामुळेच यावेळी करण्यात आली. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवण्यात आला होता. पुढे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचे पुढारी यांच्यात समझोता होऊन तो आणखी काही अंतर पुढे नेण्यात आला. याठिकाणी छोटेखानी सभाही झाली.
आंदोलनाच्या शेवटच्या टप्प्यात निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सुनील मेटकर, शरद मंगळे, सुनील घटाळे, उमेश बनसोड, प्रफुल्ल देशमुख, मुकुंद काळे, रुपराव तिडके, महादेव गारपवार, गजानन दरेकर, ममता सुंदरकर, दिगंबर नगेकर, नंदू नेतनराव आदी अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आशा व गटप्रवर्तक संघटना, अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन, किसान सभा, शेतमजुर युनियन, बांधकाम कामगार युनियनचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.