digital products downloads

कामाख्या मंदिर… एकमेव महापीठ, जिथे चैत्र नवरात्र 14 दिवस चालते: 460 पुजारी इतर तीर्थस्थळावर जात नाहीत, गुवाहाटीच्या या मंदिराला मिळाला महापीठाचा दर्जा

कामाख्या मंदिर… एकमेव महापीठ, जिथे चैत्र नवरात्र 14 दिवस चालते:  460 पुजारी इतर तीर्थस्थळावर जात नाहीत, गुवाहाटीच्या या मंदिराला मिळाला महापीठाचा दर्जा

  • Marathi News
  • National
  • Kamakhya Temple… The Only Mahapeeth, Where Chaitra Navratri Lasts For 14 Days, 460 Priests Do Not Go To Other Pilgrimage Sites…

डी. कुमार | गुवाहाटी9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात दुर्गेमातेची जी ५१ शक्तिपीठे आहेत, त्यात सर्वात शक्तिशाली कामाख्या मंदिर आहे. याला महापीठाचा दर्जा मिळाला आहे. १० व्या, ११ व्या शतकात लिहिलेल्या कालिका पुराणात याचे वर्णन आहे. येथे माता सतीची योनी पडली होती, असे सांगतात. त्यामुळे या मंदिरात मातेची कोणती मूर्ती नाही. मंदिरात एक गुहा आहे, जिच्या एका कडेला एका छोट्या खडकावर योनीची आकृती आहे. भाविक याच्या दर्शन आणि पूजेसाठी येतात.

मी पण याच्या दर्शनासाठी आसामची राजधानी गुवाहाटीत नीलांचल पर्वतराजीवर स्थापन या मंदिरात आलो आहे. दुपारचा दीड वाजला आहे आणि सामान्य दिवसांच्या तुलनेत येथे चांगली गर्दी आहे. मंदिराचे पंडा(पुजारी) पी.नाथ शर्मा यांनी आम्हाला नवरात्रीत या मंदिराच्या माहात्म्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या. त्यांच्यानुसार, या मंदिराचे पूजा नियम ६०० वर्षांपूर्वी तयार झाले होते. आजही त्यानुसार पूजा होते. येथे ४६० पुजारी आहेत, मात्र ते आपल्या आयुष्यात दुसऱ्या मंदिरात वा तीर्थस्थळाची यात्रा करत नाहीत. तसे करणे त्यांच्यासाठी पाप आहे. यामागचा त्यांचा तर्क असा की, हे एकमेव शक्तिपीठ आहे, जिथे ३४ काेटी देवी-देवतांची दररोज पूजा होते. यात ४ ते ८ तास लागतात. नीलांचल डाेंगरावर माता सतीच्या योनीचा भाग पडला होता. परिणामी येथेच सर्व सृष्टी आहे. कामाख्या मंदिरात तीन देवींचा वास आहे आणि बाहेर सातचा. हे अनोखे मंदिर दहा महाविद्या आणि भगवान शिवाची पाच मंदिरे कामेश्वर, सिद्धेश्वरा, केदारेश्वर, अमरत्सोस्वरा, अघोरादरम्यान आहेत. उर्वरित पीठांपेक्षा हे पीठ यासाठी वेगळे ठरते ते म्हणजे, एका वर्षात चार नवरात्र(दोन मुख्य आणि दोन गुप्त) होतात, ज्यात देशभरात सामूहिक पूजाअर्चा होते. मात्र,कामाख्य मंदिरातील नवरात्र पूर्णपणे गुप्त ठेवले जातेआषाढ महिन्याच्या सातव्या दिवशी कामाख्या मासिक पाळीतून जाते, तेव्हा चार दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात. यादरम्यान येथे अंबुबाचा मेळा भरतो.

शेकडो वर्षांपासून आठ परिया कुटुंबे करतात मातेचा शृंगार…

पुजारी पी.नाथा शर्मा यांच्यानुसार, या मंदिरात चैत्र नवरात्र ठरलेल्या तिथीच्या आधी ५ दिवसांपासून सुरू होते. येथे दुर्गामाता वा जगदंबेची कोणतीही मूर्ती नाही. त्यामुळे नवरात्रात गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर दुर्गेचे आसन ठेवून कलश स्थापना केली जाते. या आसनावर पाच दिवस आधीपासून पूजा पहाटे ४.०० पासून सुरू होते. मातेचा शृंगार आठ परिया कुटुंबांतील लोकच करतात. नंतर मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याच्या वंशजातील एक सदस्य आरती करतात. नंतर बळी दिला जातो.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp