
Manoj Jarange on Pankaja Munde: भारत स्वतंत्र झाला, भारतानं लोकशाही स्वीकारली. अशावेळी देश गुलाम असताना आणलेलं हैदराबाद गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी झी 24 तासच्या ‘टू द पॉईंट’ कार्यक्रमात केला होता. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यात भाषण करताना पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं असून पातळी सोडून टीका केली आहे. मराठ्यांनी तुम्हाला 30 वर्ष झक मारायला निवडून नाही दिलं अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला आहे.
इंग्रज का तुमच्या घरात राहत होते का?
“हे निवडणुकीच्या आधी आपल्याला डिवचतात. मी उतर दिलं की हे 3 ते 4 महिने गप्प बसतात. गुलामीचं गॅझेट म्हणणाऱ्या या भिकार अवलादी म्हणतात आणि 4 महिने गप्प बसतात. मग इंग्रज का तुमच्या घरात राहत होते का?.” असा सवाल मनोज जरांगे यांनी केला आहे.
‘लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ समजू नका’
“इंग्रज तुमच्या घरात राहत होते का म्हणजे तसा अर्थ काढू नका. त्या नाकतोडीला मी बोललो का? कुणाला बोट लावायची गरज आहे का? त्याच्यासाठी लोकांच्या लेकरा बाळाला तुच्छ समजू नका हरामखोरानो, तिच्या सोबत काम करणाऱ्यांनो त्यांना 5 -10 लाखांच्या कामासाठी त्यांना चाटु नका,” असा टोला त्यांनी पंकजा मुंडेंसाठी काम करणाऱ्यांना लगावला आहे.
‘कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका’
मराठ्यांनी तिच्या सोबत काम करतांना स्वाभिमान जागा ठेवा, कुणाच्या पायाखाली पाय चाटून काम करू नका. निजाम आमच्या परिवारातील नाही म्हणून गुलामी आहे. तुम्हाला इंग्रजांच्या जनगणनेने आरक्षण दिलं मग तुम्ही कोण असं आम्ही म्हणायचं का.?आम्ही तुमच्यासारखे बिघडलेल्या रक्ताचे नाहीत अशी टीका त्यांनी पंकजा मुंडेंवर केली.
’30 वर्ष झक मारायला निवडून नाही दिलं’
मी कुणालाही घाबरत नाही. तुम्ही फक्त फेसबुक व्हाट्सअॅपला लिहू शकता माजलेल्यांना गप्प करण्याची आमच्यात ताकद आहे. मराठ्यांनी तुम्हाला 30 वर्ष झक मारायला निवडून नाही दिलं अशी टीकाही त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.
मराठ्यांनी त्यांच्या डोक्यात पडलेले किडे मारून टाकावेत. हे लोक बदलणार नाहीत. त्यामुळे यांच्यावरील दया माया कमी करा. यांना निवडणुकीत पाडा. यांना पाडलं तर हे मराठयांशी नीट वागतील, इथून पुढे मराठ्यांच्या बाबतीत जे बोलतील त्यांना सोडू नका असं आवाहन त्यांनी केलं.
पंकजा मुंडेंनी काय म्हटलं होतं?
भारत स्वतंत्र झाला, भारतानं लोकशाही स्वीकारली. अशावेळी देश गुलाम असताना आणलेलं हैदराबाद गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी केला. झी २४ तासच्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात त्यांनी ही भूमिका मांडली. तसंच गॅझेटमधील नोंदी एका समाजासाठी मान्य करायच्या. मात्र दुस-या समाजाकरता त्या नाकारणं योग्य नाही असंही त्या म्हणाल्या. आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर समन्वयाची भूमिका घेण्याऐवजी वाद वाढवण्यावरच भर दिला जात असल्याचं निरीक्षणही त्यांनी नोंदवलं होतं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.