digital products downloads

कारने धडक; नंतर चाकूचे 12 वार करून एएसआयचा खून: आरोपींमध्ये चार ते पाच जणांचा समावेश‎, नवसारी चौक ते चांगापूर फाट्याजवळची घटना – Amravati News

कारने धडक; नंतर चाकूचे 12 वार करून एएसआयचा खून:  आरोपींमध्ये चार ते पाच जणांचा समावेश‎, नवसारी चौक ते चांगापूर फाट्याजवळची घटना – Amravati News

वलगाव पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कलाम अब्दुल कदीर (वय ५४, रा. जमिल कॉलनी, अमरावती) यांच्या दुचाकीला मागून कारने धडक दिली. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला नसल्याचे आरोपींना लक्षात आल्यावर त्यांनी त्यांच्यावर चाकूचे १२ ते १४ वार

.

कारने धडक; नंतर चाकूचे 12 वार करून एएसआयचा खून: आरोपींमध्ये चार ते पाच जणांचा समावेश‎, नवसारी चौक ते चांगापूर फाट्याजवळची घटना - Amravati News

पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल कलाम हे शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरून दुचाकीने वलगाव ठाण्यात कर्तव्यावर जात होते. दरम्यान अ. कलाम दुचाकीने नवसारी टी पॉइंटपासून पाचशे मीटर समोर गेल्यानंतर मागून आलेल्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे कलाम यांच्या एका पायाला व शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या व ते रक्तबंबाळ स्थितीत रस्त्यावर कोसळले. मात्र अपघातानंतरही ते जीवंत असल्याचे लक्षात येताच मारेकऱ्यांनी अ. कलाम यांना मुख्य रस्त्याच्या बाजूला घेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने घाव केले, असा घटनाक्रम पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आला आहे. या अपघातात आरोपींची कारसुद्धा मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाली असून, अमरावतीहून परतवाड्याच्या दिशेने जाणारी कार धडक दिल्यानंतर १८० अंशांच्या कोनात फिरून अमरावतीच्या दिशेने झाली आहे, यावरून कारची गती व धडकेची तीव्रता लक्षात येते.

अ. कलाम यांचा अपघात झाल्याची माहिती कळताच त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, हा अपघात नसून, मृताच्या {उर्वरित. पान ४ अब्दूल कलाम यांच्या मुलीने शनिवारीच फिजिओथेरपिस्टची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याच आनंदात कलाम यांनी शनिवारी दुपारी वलगाव पोलिस ठाण्यात सहकाऱ्यांना पेढे वाटले होते. ते आज प्रचंड आनंदी होते. अनेक सोशल मीडिया ग्रुपवर त्यांच्या मुलीच्या यशाबद्दल अभिनंदनही सुरू होते. अशातच सुरुवातीला त्यांच्या अपघाती निधनाची व त्यानंतर काही वेळातच त्यांचा खून झाल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस अधिकारी, अंमलदारांसह सर्वांनाच धक्का बसला. एएसआय अ. कलाम यांची दुचाकी व त्यांना नवसारी चौक ते चांगापूर फाट्यादरम्या धडक देणारी कार.

मुुलगी फिजिओथेरपिस्ट झाली म्हणून दुपारीच ठाण्यात वाटले पेढे

दोन जण ताब्यात ^अ. कलाम यांच्या अपघाताचा बनाव करून आरोपींना त्यांचा खून केला. त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे घाव आहेत. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, उर्वरितांचा शोध सुरू आहे. – सागर पाटील, पोलिस उपायुक्त

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp