
- Marathi News
- National
- YouTuber Arrested From Haryana; Was Giving Confidential Information To Pakistani Official, Was In Contact With Pakistani Official, Also Traveled 3 Times
हिसार50 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
हरियाणा पोलिसांनी ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती राणी ऊर्फ ज्योती मल्होत्रा हिला हिसारमधून अटक केली. तिच्याविरुद्ध सरकारी गोपनीयता कायदा आणि बीएनएसच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. एक दिवस आधीच एका पीजी विद्यार्थिनीला पाकिस्तानी गुप्तचर संस्थांशी कथित संबंधामुळे अटक केली होती. शुक्रवारी रात्री २ वाजता अटक केलेल्या ज्योतीला शनिवारी कोर्टाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
आयबी व पोलिस ज्योतीवर नजर ठेवून होते. ‘ट्रॅव्हल-विथ-जो’ नावाचे यू-ट्यूब चॅनल चालवणारी ज्योती २०२३ मध्ये पाक व्हिसासाठी दिल्लीला गेली होती. तेथेच पाक उच्चायुक्तालयात तिची एहसान-उर-रहीम ऊर्फ दानिशशी भेट झाली. तेव्हापासून ते संपर्क होते. ज्योती ३ वेळा पाकला गेली. तेथे ती अली अहवानला भेटली. ती गुप्तचर अधिकारी शाकिर व राणा शहबाज यांनाही भेटली.
- ज्योतीच्या फेसबुकवर ३.२१ लाख, यू-ट्यूबपर ३.७७ लाख, इंस्टाग्रामवर १.३२ लाख फॉलोअर्स.
- ती २ वेळा शीख जत्थेबंदींसोबत आणि एकवेळ एकटी करतारपूर साहिबला गेली. दुबई, थायलंड, इंडाेनेशिया, भुतान, चीन, बांगलादेशातही गेली.
- एप्रिल २०२४ मध्ये ती पाकला गेली. एका व्हिडिओत ती पंजाब सीएम मरियम नवाजसोबत दिसली. मरियम पाकचेे माजी पीएम नवाज यांची मुलगी आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.