digital products downloads

काल उठून याविषयी बोलत आहेत, पण परवा….: रोहित पवारांचे गंभीर आरोप; धनंजय मुंडेंची सावध भूमिका; बारामती दुर्घटनेवर ट्विस्ट – Mumbai News

काल उठून याविषयी बोलत आहेत, पण परवा….:  रोहित पवारांचे गंभीर आरोप; धनंजय मुंडेंची सावध भूमिका; बारामती दुर्घटनेवर ट्विस्ट – Mumbai News



राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी नागरी उड्डाणमंत्री, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकांमधील जवळीक दाखवत संशय व्यक्त केला. अपघाताच्या काही बाबींकडे ‘क्रिमिनल अँगल’ने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. रोहित पवारांनी सर्वात गंभीर मुद्दा मांडताना सांगितले की, अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याची चर्चा काही लोकांमध्ये आहे. आमच्याकडे याची ठोस माहिती नाही; पण अशा अँगलने चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण घटनेचा सखोल तपास व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. दुर्घटनेतील काही गोष्टी संशयास्पद वाटत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तपासाच्या दिशेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे. रोहित पवारांच्या या आरोपांवर राष्ट्रवादीचेच आमदार धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यांनी मात्र अत्यंत सावध भूमिका घेतली. ते कसं आणि काय मांडत आहेत याची मला माहिती नाही. जे हा विषय मांडत आहेत त्यांना अनुभव जास्त आहे. काल उठून याविषयी बोलत आहेत; पण परवा दादांविषयी वेगळंच काही बोलत होते. त्यामुळे हा सगळा संभ्रम आहे, असे ते म्हणाले. या विषयावर अधिक भाष्य करणे योग्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, विश्वास-अविश्वासाच्या गोष्टी पुढे समोर येतील. खरं कोण बोलत होतं, कोण भांडत होतं, आणि नेमकं कोणाला काय माहिती होतं, हे तपासातून स्पष्ट होईल. त्यांनी कोणत्याही बाजूने ठाम भूमिका न घेता संयमित प्रतिक्रिया दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतही या मुद्द्यावर मतभेद असल्याची चर्चा रंगली आहे. रोहित पवारांच्या भूमिकेला अप्रत्यक्षरित्या दुजोरा न देता, त्यांनी तपास यंत्रणांवरच निर्णय सोपवला. रोहित पवार आता एव्हिएशन एक्स्पर्ट – नितेश राणेंचा पलटवार दरम्यान, मंत्री नितेश राणे यांनी रोहित पवारांवर पलटवार केला. रोहित पवार आता एव्हिएशन एक्स्पर्ट झाले आहेत. तुमच्याकडे माहिती असेल तर ती औपचारिक अधिकाऱ्यांकडे द्या, असा टोला त्यांनी लगावला. पुढे ते म्हणाले, आता फक्त पायलट बनायचे बाकी आहे. देशाचा कायदा रोहित पवारांना चांगलाच माहीत आहे, अशी उपरोधिक टिप्पणीही त्यांनी केली. या वक्तव्यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे. कोर्ट आणि लोकायुक्तांचे आभार याच पत्रकार परिषदेत इतर मुद्द्यांवरही धनंजय मुंडेंना प्रश्न विचारण्यात आले. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावर त्यांनी भाष्य टाळले. या विषयावर पक्षाचे नेतृत्व आणि वरिष्ठ नेते बोलतील, असे त्यांनी सांगितले. तसेच अंजली दमानिया यांनी कृषी विभागातील खरेदी प्रक्रियेवर केलेल्या आरोपांबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून विविध खरेदी करण्यात आल्या, परंतु हा मुद्दा अनाठायी वाढवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. हायकोर्टाने खोटे पुरावे सादर केल्याचे नमूद करत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आणि आम्हाला क्लीन चिट दिली, असे ते म्हणाले. लोकायुक्तांनीही पुरावे नसल्याचे स्पष्ट केल्याचा उल्लेख करत त्यांनी कोर्ट आणि लोकायुक्तांचे आभार मानले. माझ्याविरुद्ध हे षडयंत्र होते. आयुष्यभर अनेक नेत्यांवर आरोप झाले; पण किती आरोप खरे ठरले? असा सवाल करत त्यांनी आपली बाजू ठामपणे मांडली. वाद आणखी चिघळण्याची चिन्हे एकूणच, बारामती विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. रेकीच्या शक्यतेपासून ते तपासाच्या दिशेपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा रंगली आहे. धनंजय मुंडेंची सावध भूमिका आणि नितेश राणेंचा टोला यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काळात तपास यंत्रणांच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp