
Naneghat Valley Crossing : सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला टवाळखोरांनी शिव्या शिकवल्याची घटना ताजी असताना मुरबाड तालुक्यातील तरुणांनी एक वेगळा आदर्श घालून दिलाय. सह्याद्री एडवेंचर ग्रुपच्या सदस्यांनी स्विझर्लंडच्या पर्यटकाला मराठी घोषणा शिकवल्यात. स्विझर्लंडच्या पर्यटकाला मराठी घोषणा शिकवणाऱ्या तरुणांचे कौतुक होत आहे.
नाणेघाटातील प्रसिद्ध जीवधन ते वानरलिंगी व्हॅली क्रॉसिंग करण्यासाठी हा तरुण स्वित्झर्लंडवरून आला होता. व्हॅली क्रॉसिंग करताना सह्याद्री एडवेंचर ग्रुपच्या सदस्यांनी त्याला जय शिवराय आणि जय महाराष्ट्रच्या घोषणा शिकवल्या.. व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवताना या पर्यटकानंही या घोषणा देत सर्वांची मनं जिंकली.
परदेशी पर्यटकाला शिव्या शिकवणा-या तरुणांना दणका
दरम्यान, परदेशी पर्यटका शिव्या शिकवणा-या टवाळखोर तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुणे ग्रामीण पोलिसांकडून या टवाळखोरांचा शोध सुरु आहे. कॅनडामधून आलेल्या एका पर्यटकाला सिंहगड किल्ल्यावर हे तरुण भेटले. त्यांनी या परदेशी पर्यटकाला शिव्या द्यायला शिकवलं. शिवीगाळ करताना आपण काहीतरी चुकीचं बोलत आहोत असं या पर्यटकाला वाटलं आणि तो तिथून निघून गेला. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. त्यानंतर याप्रकरणाविरोधात संतापाची लाट पसरली. याची दखल घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी टवाळखोर तरुणांवर गुन्हा दाखल केलाय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.