
- Marathi News
- National
- Mass Gathering Like Situation At Kumbh Mela, Hours To Walk 10 Km, 40 Crore Devotees Have Come, 19 Days Left
प्रयागराज/लखनऊ5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
कुंभमेळ्यात भाविकांची अलोट गर्दी होत आहे. वाहतूक ठप्प होत आहे. प्रयागराजला जोडणाऱ्या रस्त्यांवर अनेक किलोमीटरपर्यंत महाजामची स्थिती दिसते. भाविकांची गर्दी व व्हीआयपींची ये-जा यासाठी मार्ग काढणे सातत्याने आव्हानात्मक ठरू लागले आहे. जाममुळे १० किलोमीटर चालण्यासाठी तासनतासांचा खोळंबा होत आहे.
कुंभमेळ्यात पोलिसांनी भाविक तसेच वक्त्यांवर लाठी चालवल्याचे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळेच अलाहाबादच्या उच्च न्यायालयाने वाहतुकीचा खोळंबा व भाविकांच्या गैरव्यवस्थेवर नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक व्यवस्थेवर १४ फेब्रुवारीपर्यंत शपथपत्र मागवले. वाहतुकीच्या नावाखाली अकारण बॅरिकेडिंग का केली, असे कोर्टाने विचारले.
अलाेट गर्दीमागे हेही कारण
- २९ जानेवारीच्या चेंगरोचेंगरीनंतर सरकारने भाविकांच्या मनातील भीती प्रचार-प्रसारातून घालवली.
- ५ तारखेपासून आखाडे परतू लागले. म्हणूनच संतांच्या दर्शनाची भाविकांना घाई झाली आहे.
- गर्दी पाहून अनेकांनी ५ फेब्रुवारीनंतर येण्याचे ठरवले. यातून पुन्हा संगमावर गर्दी पाहायला मिळते.
- हवामान बदलून थंडी कमी होताच लोक वाढले.
शनिवार-रविवारी आणखी वाढणार गर्दी
शनिवार-रविवारी कुंभात भाविक वाढण्याची शक्यता आहे. प्रयागराज प्रशासनास पुन्हा अलर्ट. संगमावर भाविकांना रेंगाळू दिले जात नाही. प्रयागराज, वाराणसीत शाळा पुन्हा बंद. प्रयागला ते १२ पर्यंत बंद राहतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.