
पु्ण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ कोथरुड गोळीबार प्रकरणानंतर परदेशात पसार झाला आहे. कोथरुड प्रकरणात निलेश घायवळच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली जात आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे दोन आधार कार्ड असल्याची धक्कादायक माहिती समोर आळी आहे. या धर्तीवर निलेश घायवळच्या कर्जत जामखेडच्या सोनेगावच्या घरात पुणे पोलिस झाडाझडती घेणार आहेत. पुणे पोलिसांनी घराची झाडाझडती घेण्यासाठी न्यायालयाला परवानगी घेतली आहे.
निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात पोलिसांना जमिनीची कागदपत्र, पवनचक्की संदर्भात देखील कागदपत्र सापडली आहेत.अहिल्यानगरच्या घरात आणखी काही गबाड सापडण्याची शक्यता असल्याने पोलीस घराची झाडाझडती घेणार आहेत.
निलेश घायवळ चा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती
घायवळकडे पुणे पोलिसांचे दुर्लक्ष नडले
खंडणी प्रकरणात 2021 मध्ये न्यायालयाने जमीन देताना निलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिलेले असतानाही त्याने पासपोर्ट जमा केला नव्हता.त्याच वेळी पुणे पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्ट बाबत चौकशी केली असती. तर घायवळ नावाचा आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पासपोर्टचा विषय समोर आला असता तत्कालीन पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष नडले अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू आहे. गँगस्टर निलेश घायवळविरोधात अखेर बनावट पासपोर्ट प्रकरणातही गुन्हा दाखल केला आहे.
खरी माहिती लपवण्यासाठी बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड धारण करून पासपोर्ट काढल्याचा घायवळ विरोधात आरोप नोंदवला आहे. कोथरूड गोळीबारानंतर घायवळ विरोधात सलग पोलिसांनी चौथा गुन्हा दाखल केला आहे. नगरचा बनावट पत्ता दाखवून घायवळने पासपोर्ट काढल्याचं समोर झाल्यानंतर घायवळ विरोधात नगर की पुण्यात गुन्हा दाखल होणार याबाबत पोलीस खात्यात चौकशी सुरू होती. अखेर पुणे पोलिसांनीच घायवळविरोधात फेक पासपोर्ट प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
FAQ
निलेश घायवळ कोण आहे?
निलेश घायवळ हे पुण्यातील एक कुख्यात गुंड आहे. तो एम.कॉम पदवीधर असूनही गुन्हेगारी जगतात सक्रिय आहे. त्याला पुण्यातील इतिहासशोध (history-sheeter) म्हणून ओळखले जाते आणि तो अनेक गुन्ह्यांमध्ये मुख्य आरोपी आहे.
निलेश घायवळच्या गुन्ह्यांबद्दल काय माहिती आहे?
निलेश घायवळ आणि त्याच्या गँगवरील गुन्हेांमध्ये खून, वसुली (extortion), हिंसक हल्ले आणि शस्त्रसहित गुन्हे यांचा समावेश आहे. त्याच्या गँगने कोथरूड भागात रस्त्यावरील भांडणात गोळीबार केला होता, ज्यात एका व्यक्तीवर हल्ला झाला आणि दुसऱ्यावर शस्त्रसह हल्ला करण्यात आला. तसेच, त्याच्या गँगवर महाराष्ट्र नियंत्रण गुन्हे कायदा (MCOCA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश घायवळ सध्या कुठे आहे?
निलेश घायवळने कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर देश सोडून पळून जाण्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. तो परदेशात असल्याचे सांगितले जाते, तर सरकार आणि पोलिस त्याच्या शोधात आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.