
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथील भाविकाचा सोनप्रयाग येथे बुधवारी ता. २ सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कुरुंदा गावावर शोककळा पसरली असून त्यांचा मृतदेह रुद्रप्रयाग मार्गे कुरुंदा येथे आणला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्ति
.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरुंदा येथील सुमारे ८ ते १० भाविक ता. २३ जून रोजी केदारनाथ येथे दर्शनासाठी निघाले होते. रेल्वेने भुसावळ मार्गे त्यांचा प्रवास सुरु झाला होता. यामध्ये कुरुंदा येथील कपडा व्यावसायीक सुभाष शातलवार (६८) त्यांची पत्नी व दोन मुली देखील सोबत आहेत. हरिद्वार, सोमनाथ, द्वारका या ठिकाणी दर्शन घेऊन ते केदारनाकडे निघाले होते.
दरम्यान, केदारनाथच्या पायथ्याशी असलेल्या सोनप्रयाग येथे मंगळवारी ता. १ रात्री एका लॉजमध्ये सर्वांनी मुक्काम केले. बुधवारी ता. २ सकाळी काही जण केदारनाथ येथे जाण्यासाठी निघाले होते. तर सुभाष शातलवार त्यांची पत्नी चंद्रकला शातलवार व अन्य दोघे जण लॉजवरच थांबले होते. सकाळच्या सुमारास सुभाष यांना बोलतांना त्रास होऊ लागला होता. धाप लागल्या सारखे होत असल्याने ते अस्वस्थ झाले होते. सदर प्रकार त्यांच्या सोबत असलेल्या शिवदास सिध्देवार यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने स्थानिक डॉक्टरला आणले. मात्र डॉक्टरांनाही योग्य निदान करता आले नाही. त्यानंतर काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, कपडा व्यापारी सुभाष शातलवार यांच्या मृत्यूची माहिती कुरुंदा येथे पोहोचताच गावावर शोककळा पसरली आहे. मयत शातलवार यांचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे रुद्रप्रयाग येथे नेला जाणार असून त्यानंतर कुरुंदा गावाकडे आणला जाणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले. मयत शातलवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर या भाविकांना आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.