
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस पिकासाठी आवश्यक तेवढेच पाणी व रासायनिक खतांचा वापर करता येणार असून त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास मोठी मदत होईल, असे प्रतिपादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे तज्ञ डॉ. समाधान सुरवसे यांनी व्यक्त
.
श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यशाळेचा शुभारंभ कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी डॉ.तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडोळ आदी तज्ञ उपस्थित होते.
यावेळी डॉ.सुरवसे म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाण्याचे अचूक नियोजन करता येते. त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खत आणि पाणी देणे शक्य होते. परिणामी मातीचे आरोग्य टिकून राहते आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढते. याशिवाय (एआय )तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रोग व किडींबाबत आगाऊ सूचना मिळत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होते आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या सहा महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असून कमी खत, कमी पाणी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. कारखान्याच्या वतीने दरवर्षी ‘ऊस भूषण’ पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीपासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून जास्तीत-जास्त ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली. पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर क्षारपड व चोपड जमिनीचे क्षेत्र वाढत आहे. अशा परिस्थितीत हे आधुनिक तंत्रज्ञान जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असून कमी खत, कमी पाणी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत आहे. कमी खर्चात अधिक आणि चांगल्या प्रतीचे उत्पादन मिळाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितच मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी डॉ.तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडवळ, अविनाश पांगारकर, नितीन शिंदे यांनीही शेतकऱ्यांनी ॲपचा वापर कसा करावा याबाबतची सखोल माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस उत्पादनात १५ ते २० टक्के वाढ
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



