
हिंगोलीत या केंद्रावर सोयाबीनची खरेदी केली जात होती.
शेतकऱ्यांचे सोयाबीन ४८९२ रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासनाने खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र दिलेल्यामुदतीत नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी न करताच केंद्र बंद करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने सोयाबी
.
बीड : २३ हजार सोयाबीनउत्पादक शेतकरी राहिले वंचित ऑनलाइन नोंदणी केलेले २३ हजार ७७५ शेतकरीसोयाबीन विक्रीपासून वंचित राहिले. शासनाने ६फेब्रुवारीपासून खरेदी केंद्र बंद केले. जिल्ह्यात ४४ हजार७४४ शेतकऱ्यांनी १ ऑक्टोबर ते १५ सप्टेंबरदरम्याननाफेडकडे ऑनलाइन अर्ज केले होते. १५ ऑक्टोबर२०२४ पासून नाफेडने ३० खरेदी केंद्रांवर ६ फेब्रुवारी २०२५पर्यंत २० हजार ९६९ शेतकऱ्यांचे ५ लाख ९४ हजार २०१क्विंटल सोयाबीन खरेदी करून केंद्र बंद केले.
नांदेड : उद्दिष्टापैकी १ लाखक्विंटल सोयाबीन शिल्लक
जिल्ह्यासाठी १४ लाख ५८ हजार १६० क्विंटल सोयाबीन खरेदीचे लक्षांक ठरवण्यात आले होते. ६ फेब्रुवारीपर्यंत ५खरेदी केंद्रांवर १३ लाख ५४ हजार ६६२ क्विंटल सोयाबीनखरेदी झाली. अजूनही १ लाख तीन हजार ४९७ क्विंटलसोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट शिल्लक आहे. मात्र, खरेदीचीमुदत संपल्याने सर्व खरेदी केंद्रे बंद झाली आहेत, अशीमाहिती जिल्हा पणन अधिकारी राजेश हेमके यांनी दिली.
परभणी, हिंगोली : ५,६३२ शेतकऱ्यांनासंदेश नाही, ६ फेब्रुवारीपासून खरेदी बंद
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील २७ खरेदी केंद्रांवर गुरुवारपर्यंत ३० हजार ८४२शेतकऱ्यांचे ६ लाख ४७ हजार ७६९ क्विंटल सोयाबीन खरेदीकरण्यात आले. ६ फेब्रुवारीला रोजी खरेदी प्रक्रिया थांबली. त्यामुळे ५हजार ६३२ शेतकऱ्यांना संदेश न मिळाल्याने त्यांचे सोयाबीनविक्रीसाठी येऊ शकले नाही. आणि हिंगोली जिल्ह्यांतील ४९हजार ७२४ शेतकऱ्यांनी ६ जानेवारीपर्यंत ऑनलाइन नोंदणी केली.जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रांवर २३ हजार ८०३ शेतकऱ्यांनीनोंदणी केली. त्यापैकी १८ हजार ६२७ शेतकऱ्यांनाच मेसेज मिळाले.
थेट सवा – के. जे. शेवाळे, मार्केटिंग अधिकारी, परभणी मुदतवाढीच्या सूचनेची प्रतीक्षा
Q. शेतकऱ्यांना मेसेज का आले नाही ? A. ६ फेब्रुवारीला सोयाबीन खरेदीची मुदतसंपली. त्यामुळे अनेक शेतकरी संदेशपाठवण्यापासून वंचित राहिले. Q. शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? A. खरेदी केलेले सोयाबीन वेअर हाऊसमध्येसाठवणूक झाल्याची पावती मिळताचशेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील. Q. खरेदीला मुदतवाढ मिळेल का? A. सध्या तरी खरेदीला मुदतवाढ दिल्याचीकुठलिही सूचना अद्याप प्राप्त झालेली नाही. Q. शेतकऱ्यांच्या बारदान्याचे काय? A. ज्या ठिकाणी बारदाना नसल्यामुळेशेतकऱ्यांच्या बारदान्यामध्येच सोयाबीन खरेदीझाली त्या ठिकाणीच शेतकऱ्यांना बारदानामिळेल. लवकरच त्याची माहिती देऊ.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.