
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी ज्ञान प्रबोधिनी, निगडी, पुणे येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना अडचणींपासून पळून न जाता, त्यांचा निधड्या छातीने सामना करण्य
.
ज्ञान प्रबोधिनी संस्थेतील सातवी-आठवीच्या ४६ विद्यार्थ्यांनी गडकरींशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी त्यांना नेतृत्वकौशल्य, राजकारणातील प्रवेश, बालपण, महामार्गांचे जाळे, कुटुंबाला वेळ देणे आणि छंद यांसारख्या विविध विषयांवर प्रश्न विचारले.
आपल्या विद्यार्थीदशेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आईच्या संस्कारांमुळे आपण घडलो, असे गडकरींनी सांगितले. आईच्या व्यक्तिमत्त्वाची छाप आपल्यावर पडली असून, घर सांभाळून देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आई, संघ आणि विद्यार्थी परिषदेने दिली, असे ते म्हणाले.
‘मनसा सततम् करणीयम्’ हा मंत्र घेऊन गोरगरीब, शेतकरी आणि मजुरांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत असल्याचे गडकरींनी नमूद केले. समाजातील उपेक्षित आणि गरीब लोकांना प्रकाशाची वाट दाखवणे ही आपली जबाबदारी असून, भविष्यात विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
शिक्षण, क्रीडा, आरोग्य, उद्योग आणि कृषी या प्रत्येक क्षेत्रात चांगले काम करण्याचा प्रयत्न करायला हवा. छोट्या प्रयत्नांतूनच मोठ्या कामांना सुरुवात होते. जात-पात-धर्म न पाळता जनतेची सेवा करावी, असेही गडकरी म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना आपला आदर्श मानत असल्याचे सांगत, महापुरुषांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास उत्तम समाज घडू शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी ‘स्वयम् अब जानकर हमको… जगाना देश है अपना’ हे गीत सामूहिकरित्या सादर केले. ज्ञान प्रबोधिनी ही संस्था गेल्या ४० वर्षांपासून शिक्षण, ग्रामविकास, स्त्री शक्ती प्रबोधन, संघटन, संशोधन, उद्योग, आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता आणि युवक-युवतींचे संघटन या क्षेत्रांत कार्यरत आहे. निगडी केंद्रात दोन हजारांहून अधिक विद्यार्थी औपचारिक शिक्षणासोबत अनुभव शिक्षणही घेत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



