
- Marathi News
- National
- After Joshimath In Uttarakhand, Now Nandanagar Part Of Chamoli Is Sinking Underground, 34 Families Left Their Homes, The Market Is Also Empty
मनमीत | डेहराडून41 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नंदानगर घाटात भीषण संकट निसर्ग उत्तराखंडच्या पर्वतरांगांवर तांडव करतच आहे. जोशीमठाचे घाव अजून भरलेही नव्हते की आता ‘मां नंदा’चे माहेर मानला जाणारा चमोली जिल्ह्यातील नंदानगर घाट पूर्णपणे जमीनदोस्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या आठवड्यातील सलग पाऊस व भूधसांनामुळे संपूर्ण गावाची पायाभरणी हादरली आहे. शुक्रवार उशिरा रात्री परिस्थिती झपाट्याने बिघडू लागली. क्षणात ८ घरे कोसळली. उर्वरित घरांना धोका लक्षात घेऊन प्रशासनाने ३४ कुटुंबांना सुरक्षिततेसाठी घरे रिकामी करण्यास भाग पाडले. सर्व घरांत अचानक मोठ्या भेगा पडल्या आहेत.
बाजारातील सुमारे ४० दुकाने कोसळण्याच्या उंबरठ्यावर आहेत, त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने रिकामी केली आहेत. सर्वात मोठा धोका बाजाराच्या वरच्या बाजूस हलत असलेल्या प्रचंड दगडाचा आहे. सुमारे १५० दुकाने ढिगाऱ्याखाली जातील. आयुष्यभराची कमाई खर्चून उभारलेली घरे आणि दुकाने आता नाशाच्या काठावर उभी आहेत असे व्यापारी म्हणतात. नंदानगर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष नंदनसिंह बिष्ट यांनी सांगितले की पुढील पाच दिवस ‘रेड अलर्ट’चे असून दगड सतत घसरताना दिसत आहे.
चारधाम व हेमकुंड यात्रा स्थगित
दरम्यान, उत्तराखंडमध्ये सातत्याने होत असलेल्या पावसामुळे सरकारने चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रा ५ सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे.
केदारनाथ यात्रा मार्गावर दुर्घटना : बोल्डर पडल्याने २ भाविकांचा मृत्यू, अनेक जखमी
डेहराडूनच्या सोनप्रयाग-मुनकटिया मार्गावर सोमवारी सकाळी डोंगर खचल्याने बोल्डर एका वाहनावर पडला. यात उत्तरकाशीच्या २ भाविकांचा मृत्यू झाला.२ गंभीर जखमी झाले तर ७ जणांना किरकोळ दुखापत झाली.वाहनात ११ भाविक होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.