
Buldhana News: गेल्या काही महिन्यांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील काही गावांतील रहिवाशांना अचानक टक्कल पडू लागले होते. मात्र आता या प्रकरणाने गंभीर वळण घेतलं आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. केस आणि नखं गळती प्रकरणाने गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील केसगळती प्रकरणामुळं शेगाव तालुका चर्चेत आला होता. गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक भीतीच्या छायेत होते. पण आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे गळून पडू लागली आहेत. तर, काही नागरिकांची नखे विद्रुप होऊन कमजोर झाली आहेत.
केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे.आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आयसीएमआर रिपोर्ट दाबून ठेऊन रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून नखं गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत, तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे.. या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
शेगाव तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन तीन दिवसांतच टक्कल पडत असल्याचे समोर आले होते. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वक्षण सुरू केले होते. यावेळी नागरिकांच्या रक्ताचे नमुनेदेखील गेले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.