digital products downloads

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरी, डॉलर-अंगठी लंपास: खरेदी करताना घडली घटना; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

कोंढव्यात इराणी महिलेची पर्स चोरी, डॉलर-अंगठी लंपास:  खरेदी करताना घडली घटना; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News



पुण्यात कोंढवा येथील कौसरबागेत खरेदीसाठी गेलेल्या एका इराणी महिलेची पर्स चोरण्यात आली आहे. या पर्समध्ये १०० अमेरिकन डॉलर, भारतीय चलन आणि सोन्याची अंगठी असा ऐवज होता. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलांनी बुरखा परिधान केला होता, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील कौसरबाग परिसरात रमजाननिमित्त विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले आहेत. तक्रारदार महिला मूळची इराणची असून, व्यावसायिक व्हिसावर भारतात आली आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून ती येथे वास्तव्यास आहे. ती कोंढव्यातील कोणार्कपुरम सोसायटीत राहते. संबंधित महिला कौसरबागेतील नबाब मोहल्ला येथे खरेदीसाठी आली होती. एका स्टॉलवर थांबली असताना, बुरखा परिधान केलेल्या दोन महिला तिच्याजवळ आल्या. इराणी महिलेचे लक्ष नसताना, या दोन महिलांनी तिची पर्स चोरून नेली. पसार झालेल्या महिलांचा शोध पोलीस घेत असून, त्यांनी कौसरबाग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. गांजा बाळगणारा रिक्षा चालक अटक वाघोली पोलिसांनी गांजा बाळगणाऱ्या एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. त्याच्याकडून गांजा, रिक्षा आणि मोबाईल असा एकूण २ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद जिशान अकबर अली अन्सारी (वय २८, रा. भावडी रस्ता, वाघोली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अन्सारी मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनोर येथील रहिवासी आहे. २८ फेब्रुवारी रोजी वाघोली पोलिसांचे पथक गस्त घालत असताना, अन्सारी मोकळ्या मैदानात रिक्षासह संशयास्पद स्थितीत थांबलेला दिसला. पोलिसांनी त्याच्या हालचाली टिपून त्याला ताब्यात घेतले आणि झडती घेतली. झडतीदरम्यान, त्याच्याकडे ६ हजार ६८० रुपये किमतीचा गांजा, एक मोबाईल संच आणि रिक्षा असा मुद्देमाल आढळला, जो पोलिसांनी जप्त केला. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे आणि सहायक आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, उपनिरीक्षक मनोज बागल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp