digital products downloads

कोकणात राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम: नीलेश राणेंनी स्टिंग केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी नितेश राणेंची भेट; म्हणाले – हमाम में सब नंगे हैं – Kolhapur News

कोकणात राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम:  नीलेश राणेंनी स्टिंग केलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी नितेश राणेंची भेट; म्हणाले – हमाम में सब नंगे हैं – Kolhapur News


कोकणातील मालवण मतदारसंघात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर केलेल्या स्टिंग ऑपरेशननंतर सर्वच राजकीय समीकरणं एकाच झटक्यात बदलली आहेत. अवैध रोख रक्कम ठेवून प

.

वास्तविक 25 नोव्हेंबरच्या रात्री नीलेश राणे त्यांच्या पथकासह थेट भाजप पदाधिकारी विजय किनवडेकर यांच्या घरात पोहोचले. त्यांच्या मते, तिथे हिरव्या रंगाच्या पिशवीत सुमारे 25 लाखांची बेहिशोबी रोख रक्कम आढळून आली. संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये टिपला गेला असून, राणेंनी तो प्रसारमाध्यमांना आणि पोलिसांना दिल्याचे सांगितले. या प्रकरणामागे भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांचा हात असल्याचा थेट आरोप करत, जेव्हा जेव्हा चव्हाण सिंधुदुर्गात येतात, तेव्हा काहीतरी संशयास्पद घडतचं, असा घणाघात केला. मैदानात उतरा, पैशाच्या जोरावर मतं खरेदी करू नका, असा जाहीर संदेशही त्यांनी दिला.

इतक्यावरच नाही तर आणखी काही घरे आणि काही जणांकडे अशाप्रकारे काळा पैसा साठवून ठेवण्यात आल्याचा दावा करत, राणेंनी काही नावंही जाहीर केली. आमच्याकडे संपूर्ण यादी आहे. कोण कुठे, किती रक्कम देतो याचे पुरावे लवकरच देऊ, असे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या पावलानंतर विरोधकांनीही भाजपवर हल्लाबोल करत वातावरण आणखी चिघळवले आहे. मात्र, नीलेश राणेंच्या या कारवाईनंतर प्रकरण थेट भावांभाऊंच्या वैयक्तिक आणि राजकीय संघर्षात बदलत चालले आहे.

व्यवसायातून कमाई झालेली रक्कम ठेवली तर त्यात चूक काय?

राष्ट्रीय राजकारणात राणे कुटुंबाचा उल्लेख आला की वाद हा अभिन्न भाग असतो. कोकणातील राणे बंधूंमधील मतभेद सर्वश्रुत आहेतच. परंतु या वेळी भावाभावांमधील वाद संपुष्टात येण्याऐवजी अधिकच उफाळून आला आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी स्वतःच्या पक्षाचे समर्थन करत तडाखेबाज प्रतिक्रिया दिली. खासगी व्यवसायातून कमाई झालेली रक्कम आपल्याकडे ठेवली तर त्यात चूक काय? फक्त राजकीय चष्म्यातून बघू नका, असे ते म्हणाले. आमच्या विरोधकांनी आमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. नियम जो आहे तो सर्वांनाच लागू. हमाम में सब नंगे है! अशा शब्दांत त्यांनी भावाच्या स्टिंगवर पलटवार केला. याशिवाय, युतीची चर्चा करण्याची वेळ गेली. प्रक्रियेनुसारच सर्व निर्णय होतात, असे म्हणत त्यांनी भावाच्या युतीविषयी आरोपालाही उत्तर दिले.

राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम

एका घरात सापडलेल्या पैशामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला आहे. प्रचाराची दिशा पूर्णपणे बदलली आहे. राणे विरुद्ध राणे असा राजकीय संग्राम कोकणकार बघत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष थेट या वादात अडकले आहेत. शिवसेना शिंदे गटानेही त्यांच्या आमदाराच्या पाठीशी उभं राहत भाजपवर हल्ले चढवले आहेत. दुसरीकडे, विरोधकांनीही भाजपचा पैशाचा खेळ असा ठपका ठेवत सरकारवर धारेवर धरले आहे. निवडणूक जितकी जवळ येतेय तितका मुद्दा धारदार होत चालला आहे. पुढील चौकशी, कारवाई आणि राजकीय प्रतिक्रिया यावर या प्रकरणाचा निकाल अवलंबून असेल. मात्र, यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, कोकणातील निवडणुकीत आता पैशाच्या राजकारणाचा मुद्दा प्रचंड गाजणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp