
Kokan Crime News: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या महिलेसोबत नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू कसा झाला याबद्दलचं गूढ वाढलं आहे.
दोन दिवसांपासून घेत होते शोध
संगमेश्वर तालुक्यातील धामापूर येथील विवाहित महिला अपेक्षा अमोल चव्हाण या महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरेकाशी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात सापडला. कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी अपेक्षाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. चिपळूण पोलीस मागील दोन दिवसांपासून अपेक्षाचा शोध घेत होते. स्थानिकांच्या मदतीने सुरु केलेल्या शोधमोहिमेमध्ये अपेक्षाचा मृतदेह सापडला. अपेक्षासोबत काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाही.
मोबाईलच्या शेवटच्या लोकेशनच्या सहाय्याने शोध
धामापूर येथील अपेक्षा चव्हाण ही घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याने नातेवाईकांनी पोलिसांशी संपर्क साधला. चौकशीनंतर अपेक्षा चव्हाणच्या मोबाईलचे लोकेशन चिपळूणमध्ये दिसून आले. शहरातील गांधारेश्वर येथील पुलावर तिचा मोबाइल, पर्स व चप्पल आढळल्याने पोलिसांचाही गोंधळ उडाला होता. चिपळूण पोलिसांनी अपेक्षा बेपत्ता झाल्याची नोंद करून तातडीने शोधमोहीम सुरू केली. गोवळकोट परिसरात वाशिष्ठी नदीपात्रात शोधमोहीम सुरू असतानाच मजरेकाशीच्या किनाऱ्यावर अपेक्षाचा मृतदेह आढळला. ही माहिती पोलिसांनी तिच्या नातेवाईकांना दिली. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. पोलीस आता अपेक्षासोबत नेमकं काय घडलं असावं याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले असून अपेक्षाच्या घरातील लोकांचीही चौकशी केली जात आहे.
या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरित
अपेक्षासोबत काही घातपात झाला की तिने आत्महत्या केली यासंदर्भातील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अपेक्षाला शेवटचं कोणी पाहिलं होतं? ती कोणाच्या दबावाखाली घर सोडून गेली होती का? तिचं शेवटचं बोलणं कोणाशी आणि काय झालं होतं? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर अनुत्तरित असून पोलिसांकडून अपेक्षाच्या मृत्यूचं गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे.
FAQ
कुठे सापडला मृतदेह?
महिलेचा मृतदेह चिपळूण तालुक्यातील मजरेकाशी येथील वाशिष्ठी नदीच्या पात्रात सापडला.
शेवटचं लोकेशन कुठे?
अपेक्षा चव्हाणच्या मोबाईलचे लोकेशन चिपळूणमध्ये दिसून आले. शहरातील गांधारेश्वर येथील पुलावर तिचा मोबाइल, पर्स व चप्पल आढळल्याने पोलिसांचाही गोंधळ उडाला होता.
कोणत्या प्रश्नांची उत्तर पोलीस शोधत आहेत?
अपेक्षाला शेवटचं कोणी पाहिलं होतं? ती कोणाच्या दबावाखाली घर सोडून गेली होती का? तिचं शेवटचं बोलणं कोणाशी आणि काय झालं होतं?
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.