digital products downloads

‘कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या…’, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील बैठकीत विलीनीकरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

‘कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या…’, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालील बैठकीत विलीनीकरणासंदर्भात महत्त्वाचा निर्णय

NCP Weekly Meet Decision About Merger Of 2 NCP: सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साप्ताहिक बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीला पक्षाचे वरिष्ठ नेते, आमदार, खासदार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. अजितदादांची कामाची गती, प्रशासनावरील भक्कम पकड आणि विकासकेंद्रित भूमिका हीच राष्ट्रवादीची ओळख राहील, असं यावेळी सुनेत्रा पवार यांनी म्हटलं. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासंदर्भातील चर्चांना उधाण आल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची एक मताने निवड झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याचबरोबर या बैठकीमध्ये विलीनीकरणासंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून तशा सूचना पक्षाच्या नेत्यांना करण्यात आल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवारच होणार राष्ट्रीय अध्यक्ष; तारीखही ठरली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीची तारीख निश्चित करण्यात आली. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची कार्यकारिणीची बैठक पार पडणार असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनाच राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाणार असल्याचं ठरवल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची एक मताने निवड झाली. बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्याकडून करण्यात आली अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रफुल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा झाल्यानंतर सर्व आमदारांकडून हात वर करून सुनेत्रा पवार यांच्या नावाला समर्थन देण्यात आलं.

विलीनीकरणासंदर्भात काय ठरलं?

सोबतच पक्षाच्या साप्ताहिक बैठकीमध्ये, “कोणीही दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर प्रसारमाध्यमांशी बोलू नये” अशी सूचना पक्षाच्या सर्व आमदारांना करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी बैठकीत या सूचना केल्या. विलीनीकरणाचा मुद्दा काही नेते मंडळींनी उपस्थित केला होता. मात्र विलीनीकरणावर बैठकीत चर्चा न करण्याच्या नेत्यांच्या सूचना असल्याने हा विषय बैठकीत चर्चेला आला नाही.

विलीनीकरणासंदर्भात जयंत पाटील काय म्हणाले?

विलीनीकरणासंदर्भात काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटलांनी, “मी आता काही बोलणार नाही. माझी आणि दादा यांची 11 वेळ भेट झाली होती. सहकाऱ्यांच्या काही शंका होत्या त्यावर सुद्धा चर्चा झाली होती. वेगवेगळ्या नेत्यांचे विधानं मी बघतोय. त्यावर मी काही बोलणार नाही,” असं म्हटलं होतं. तसेच विलीनीकरण होणार का? या प्रश्नावर बोलताना जयंत पाटलांनी, “शशिकांत शिंदे, सुप्रिया ताई निर्णय घेण्यास सक्षम आहेत. आमचा पक्ष सुरू आहे. कामकाज सुरू आहे. आज विलीनीकरण यावर मला काही बोलावंसं वाटत नाही,” असं म्हटलं होतं. भविष्यात विलीनीकरण होईल का? असं जयंत पाटलांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी, “राजकारणात उद्या काय होईल हे आता सांगता येत नाही. आजचा दिवस उद्या येईल का हे माहिती नाही. पक्ष आहे, पक्षाचे अस्तित्व आहे. पवारसाहेबांचे नेतृत्व आहे,” असं उत्तर दिलं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp