digital products downloads

‘कोणीही समजू नका आपल्या पाठीशी कोणी नाही’, सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन

‘कोणीही समजू नका आपल्या पाठीशी कोणी नाही’, सुनेत्रा पवारांचं कार्यकर्त्यांना आश्वासन

DCM Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी सुनेत्रा पवार बैठकीदरम्यान भावनिक झाल्याच दिसलं. आपल्याला अजित पवार यांचं स्वप्न पुणे करायचं आहे. कोणीही समजू नका आपल्या पाठीशी कोणी नाही. मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभी आहे. अजित पवार ज्या पद्धतीने काटेकोर पद्धतीने काम करायचे तस काम आपल्याला करायचं आहे. मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. सुनेत्रा पवार यांच कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पोरकं समजू नका

सुनेत्रा पवार यांनी निवडणून आलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सुनेत्रा पवार भावुक झाला. त्यांनी प्रत्येकाला सांगितलं की, तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. अजित पवार गेल्यानंतर त्यांचा पक्ष एकटा पडला का, अशा चर्चा रंगल्या आहेत. असं असताना बैठकीच्या सुरुवातीलाच त्यांनी पदाधिकाऱ्यांना खंबीर आधार दिला आहे. 

अजित पवार जसे पाठबळ देत होते तसंच पाठबळ सुनेत्रा पवार यांनी आम्हाला दाखवलं. सुनेत्रा पवार यांनी ज्या सक्षमपणे पदर खोचून नेतृत्व करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांच्यामध्ये आम्हाला जिजाऊ दिसल्या अशी प्रतिक्रिया अतुल बेनके यांनी दिली आहे. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने अजित पवारांचा पक्ष पुढे जात आहे. जो विचार अजित पवारांनी दिला तोच विचार सुनेत्रा पवार पुढे नेत असल्याची माहिती अतुल बेनके यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी वेगळ्या होऊन दोन झाल्यामुळे त्याचा फटका आम्हाला बसला हे आम्ही सुनेत्रा पवार यांनी सांगितलं आहे. 

अजित पवार यांच्या विलिनीकरणाचा मुद्दा या बैठकीत चर्चेत आलेला नाही. पण खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र काम करत आहोत. हाच निरोप आम्ही सुनेत्रा पवार यांना दिला आहे. जु्न्नर तालुक्यात आम्ही दोन्ही पक्ष एकच म्हणून काम करतील, असं अतुल बेनके म्हणाले. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आढावा घेतला आहे. पुणे महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद एक एक वर्षे देणार असल्याच त्या म्हणाल्या. पाच नगरसेवकांना एक एक वर्षे विरोधी पक्ष नेते पद मिळणार आहे. तसेच स्थायी समिती सदस्य पद ही एक एक वर्षे देणार असल्याच सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. ल मुंबईत झालेल्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला आहे. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp